Ticker

6/Breaking/ticker-posts

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसलेंना ईडीचा मोठा दणका; ४ कोटींची मालमत्ता केली जप्त

 

*  सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना दणका.

*पुण्यात असलेली अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची जागा ईडीच्या ताब्यात..







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणे: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना दणका दिला आहे. मोठी कारवाई करत ईडीने भोसले यांची तब्बल ४ कोटी रुपये किंमतीची संपत्ती जप्त केली आहे. पुण्यात असलेली अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची ही ४ कोटी रुपये किमतीची जागा ईडीने ताब्यात घेतली आहे.)

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसले आणि त्यांचे पुत्र अमित भोसले यांच्यावर ईडीचे लक्ष होते. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने दोघांनाही समन्स धाडले होते. गेल्या महिन्यात त्यांची सुमारे ५ तास चौकशीही झाली होती.

पुणे येथील एका सरकारी जमिनीवर अविनाश भोसले यांनी बांधकाम केले आहे. यानंतर त्यांच्याविरोोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ईडीनेही गुन्हा दाखल करून त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते.

आतापर्यंत ४० कोटींच्यावर मालमत्ता जप्त

फेमा कायद्याअंतर्गत ईडीने अविनाश भोसले यांच्याविरोधात कारवाई करत आतापर्यंत त्यांची एकूण ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे. पुणे आणि नागपूरमधील हे मालमत्ता आहे. या बरोबरच विदेशी चलन प्रकरणातही भोसले यांची दोनदा चौकशी झालेली आहे. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांची देखील चौकशी करण्यात आली होती.

अविनाश भोसले यांनी मुंबईत देखील मालमत्ता खरेदी केलेली आहे. त्यांनी दक्षिण मुंबईत एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट त्यांनी १०३ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केलेला आहे. याबरोबरच त्यांनी एबीज रिअलकॉन एलएलपी या कंपनीत गुंतवणूक देखील केलेली आहे.

ईडीने ११ फेब्रुवारीला अविनाश भोसले यांच्या ४ मालमत्तांवर छापे टाकले होते. त्यानंतर अमित भोसले याला ताब्यात घेत चौकशीही केली. मात्र १२ फेब्रुवारीला दोघेही चौकशीसाठी हजर न राहता त्यांनी ईडीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या