Ticker

6/Breaking/ticker-posts

नीरज चोप्राच्या गोल्डची कमाल; नीरज नाव असणाऱ्यांना मोफत पेट्रोल…

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

भरुच: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने इतिहास घडवला. नीरजने पदक जिंकून तीन दिवस झाले तरी त्याच्या नावाची आणि कर्तुवाची चर्चा काही थांबत नाही. नीरजला विविध राज्य सरकारांकडून मिळून ११ कोटींपेक्षा अधिक बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

नीरजचे हे पदक अॅथलेटिक्समधील पहिले आणि वैयक्तीक प्रकारात दुसरे ठरले आहे. नीरजच्या या कामगिरीने संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. त्याच्या या कामगिरीने खुष होऊन एका पेट्रोल पंपाच्या मालकाने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केलाय.


गुजरातमधील भरुच जिल्ह्यातील नेत्रांग शहताली एका पेट्रोल पंप मालकाने नीरज नावाच्या व्यक्तींना मोफत पेट्रोल देण्याचे जाहीर केले आहे. ही ऑफर सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असेल असा त्याने बोर्ड लावला आहे. नीरज नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार आहे.


एसपी पेट्रोलियमच्या मालकाने सांगितले की, टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राच्या यशासाठी ही ऑफर ठेवण्यात आली आहे. संबंधित पेट्रोल पंपावर सर्व कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी नीरज नावाच्या व्यक्तींचे स्वागत करावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या