Ticker

6/Breaking/ticker-posts

दंहीहंडी साजरी होणार का? ; गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची आज बैठक









 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबईः राज्यात करोनाची दुसरी लाट उतरणीला लागली आहे. त्यानुसार राज्यात अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी सण- समारंभांवर अद्यापही बंधनं कायम आहेत. दहीहंडी (गणेशोत्सवासाठी या सणांसाठी अवघे काही दिवस उरले असताना सणांसाठी निर्बंधांत सूट देण्याची मागणी करण्यात येत आहे. येत्या ३१ ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांसोबत एक बैठक आयोजित केली आहे.

यंदा ३१ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव आहे. त्यामुळं मागील वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव निर्बंधांत साजरा होणार का? की राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार का हे आज स्पष्ट होणार आहे. छोट्या प्रमाणात का होईना दंडीहंडी साजरी करण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांनी केली आहे. यावर आज बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

दहीहंडी समन्वय समितीच्या पदधिकाऱ्यांसोबत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे. दहीहंडी पथकांनी छोट्या प्रमाणात का असेन पण दहीहंडी साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, दहीहंडीबाबात राज्य सरकारने अद्याप कोणाताही निर्णय घेतला नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ३१ ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी करणार असल्याचं मनसेनं जाहीर केलं आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांनी फेसबुक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या