Ticker

6/Breaking/ticker-posts

संजय राऊत यांचा कार्यक्रम करणार ; नीलेश राणेंचा इशारा

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

सिंधुदुर्ग: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबीयांचे सुरू झालेले वाकयुद्ध शमताना दिसत नाही. भाजप नेते, माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. संजय राऊत जेथे दिसतील तेथे करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा नीलेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय वाद हा अधिकच वाढणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

माजी खासदार नीलेश राणे हे एका वृत्त वाहिनीशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीयांचा वाद अधिकच तीव्र बनला आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना करेक्ट कार्यक्रमाचा उल्लेख करत भाष्य केले होते. आम्ही आणखी एखादा करेक्ट कार्यक्रम करू असे राऊत म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना राणे यांनी हा इशारा दिला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडताना नीलेश राणे म्हणाले की, करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय?, संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या