Ticker

6/Breaking/ticker-posts

पाश्चात्त्य ज्ञानमुळेच राष्ट्रवादी चळवळीचा उदय झाला - डॉ. अनिल बैसाणे










लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर :-विसावे शतक संघर्षमय शतक म्हणून गणले जाते कारण या शतकात युरोपियन साम्राज्यवादाचा उदय होऊन पहिले आणि दुसरे महायुद्ध, हुकूमशहांचा उदय, रशियन राज्यक्रांती यांसारखे अनेक संघर्ष जागतिक पातळीवर उद्भवले .यातून वर्चस्व करिता स्पर्धा निर्माण झाल्या. पाश्चिमात्यांनी आफ्रिका व आशिया खंडातील देशांवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांची अर्थव्यवस्था आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेला अनुकूल करून टाकल्या मात्र या वाटचालीतूनच पाश्चात्त्य जगतातील नवे ज्ञान पारतंत्र्यातील लोकांनीही  आत्मसात केले त्यातूनच राष्ट्रवादी चळवळीचा उदय झाला असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्राचार्य डॉ. अनिल बैसाणे यांनी केले.


 ते राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता, ग्रंथालय संचालनालय मुंबई ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत व्याख्याते म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की आपल्या देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य आवश्यक असल्याची जाणीव निर्माण झाली .जपानचा अपवाद वगळता भारतात राष्ट्रवादी चळवळीचा उदय सर्वात आधी झाला. सन अठराशे सत्तावनच्या उठावातील अपयशातून भारतीय प्रबोधनाला प्रारंभ झाला .या वाटचालीतून नवसुशिक्षित तरुणांनी 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केली. हे भारताला स्वातंत्र्यप्राप्तीकरिता महत्त्वपूर्ण पाऊल ठरले .या परीपाकातून मवाळ नेते यात फिरोजशहा मेहता ,उमेशचंद्र बॅनर्जी, लाला लजपतराय त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला विरोध करून स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केले .दुसऱ्या बाजूला जहाल नेत्यांचे कार्य दिशादर्शक ठरले यात आघाडीवर लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल हे होते आणि या वेळेसच महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात या देशातील शेतकरी, कामगार, मजूर, महिला यांचा स्वातंत्र्य आंदोलनात प्रवेश झाला. याच वेळी दुसरा प्रवाह सशस्त्र क्रांतिकारकांचा वर्गही  मायभूमीच्या मुक्तते करिता बळी जाण्यास तत्पर होऊन स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय उराशी बाळगून होता .यामध्ये चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर ,रासबिहारी बोस ,नेताजी सुभाष चंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू ,राजे उमाजी नाईक ,शिरीष कुमार ,यांसारख्या क्रांतिकारकांचा समावेश होता. यात जुलमी राज्यकर्त्यांना  ठार करणे हे पाप नसून मातृभूमीच्या मुक्ततेकरिता तिच्या सुपुत्रानी केलेले हे पवित्र कर्तव्यच असल्याचे त्यांची श्रद्धा होती.     
      
स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्याकरिता  गोपाळ गणेश आगरकर ,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ,राजश्री शाहू महाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाजसुधारकांनी केलेल्या कामातून आपल्याला राजकीय व सामाजिक हक्कांची प्रतिष्ठापना होऊन आपले आझादीचे स्वप्न साकार झाले आहे. आज आपण या देशभक्त व समाज सुधारकांच्या योगदानामुळे स्वातंत्र्यप्राप्तीची चांगली फळे चाखत आहोत. त्यांच्या चरित्राचे व इतिहासाचे कायम स्मरण ठेवले पाहिजे त्यासाठी त्यांची ग्रंथसंपदा वाचली पाहिजे असेही श्री बैसाणे म्हणाले .जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांची चरित्रे ,भारताचे स्वातंत्र्य विषयक ग्रंथ यांचे प्रदर्शन भरविण्यात आले त्याचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव -भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले .यावेळी त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या स्वातंत्र्यप्राप्तीकरिता दिलेल्या योगदानाचा मोलाचा वाटा असून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मला अधिकारी घडविण्यात सार्वजनिक ग्रंथालयाचा सिंहाचा वाटा असल्याचे मत व्यक्त करून चरित्रात्मक पुस्तकांचे वाचन युवकांनी केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले .प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी केले. त्यांनी सदर ग्रंथप्रदर्शन दिनांक 20 ऑगस्ट पर्यंत सर्वांसाठी शासकीय सुट्ट्या वगळून10 ते 4 या वेळेत विनामूल्य उपलब्ध आहे .त्याचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन केले सूत्रसंचालन राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार निरीक्षक रामदास शिंदे यांनी मांडले .यावेळी संदीप नन्नवरे, शैलेश घेगडमल हे ही उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या