Ticker

6/Breaking/ticker-posts

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून ढाकणे यांनी दिला धीर*

पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदतीसाठी पाठपुरावा करणार


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळीमानुर /पाथडीॕ- काल रात्री झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावातील शेतीचे,घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अॕड.प्रताप ढाकणे यांनी याची माहिती उप मुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली असून नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले असल्याची माहिती केदारेश्वर साखर कारखान्याचे संचालक,युवा नेते   ऋषीकेश ढाकणे यांनी दिली.

    काल दि.३० आॕगस्टच्या मध्यरात्री पासून तालुक्यातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस बरसला.काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस कोपला.त्यामुळे अनेक गावांतील नद्यांना पूर येऊन पाणी लोकांच्या घरात,रानात शिरले.अनेकांची गुरे,मोटारसायकली सुध्दा वाहून गेल्या तर अनेक गावांत घरांचीही पडझड झाली.याची माहीती मिळताच केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अॕड.प्रताप ढाकणे पहाटेपासूनच अॕक्शन मोडमध्ये आले.त्यांनी तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना परिस्थितीची कल्पृना देत जिल्हा प्रशासन सजग करायला लावले.त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही अॕड.ढाकणे यांनी शेवगाव व पाथडीॕच्या अतिवृष्टीची माहीती फोनवरून दिली.त्यानंतर पवार यांनी मुश्रीफ यांच्याशी बोलणे करून जिल्हा प्रशासनाला मदतीसाठी आदेश दिले.यानंतर जिल्हाधिकारी स्वतः तातडीने पाथडीॕकडे रेस्यू टीमसह रवाना झाल्याची माहीती ढाकणे यांना देण्यात आली.

 


  

तोपर्यंत रूषिकेश ढाकणे यांनी तालुक्यातील शेकटे,आगसखांड,अकोला कोरडगाव,कोळगाव तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर,भगूर,आखेगाव,वडुले,वाघोली या गावांची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांना धीर दिला.

    ढाकणे म्हणाले,गेल्या वषॕ भरापासून तालुक्यात नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणात आली आहेत.कालचा पाऊस प्रचंड प्रमाणात झाल्याने हाताशी आलेली पिके झोपली आहेत.अनेक घरांचेही नुकसान झाले तर अनेकांनी गुरे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली असून वरिष्ठ पातळीवरून पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला मिळाली आहेत.तुताॕस मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यानंतर पृंचनामे करण्यात येतील.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी व पडझड झालेल्या घर मालकांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात प्रशासनाला सहकार्य करावे.उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या माध्यमातून ठोस मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्याचप्रमाणे विमा कंपन्यांच्या माध्यमातूनही शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करू.लोकांनी धीर सोडू नये आम्ही आपल्या सोबतच आहोत.       अकोलेतील अनेकांना पावसाचा फटका बसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.याची दखल घेत ढाकणे यांनी अकोलेतील दादापाटील ढाकणे विद्यालयात ग्रामस्थांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. टाकळीमोनर 

पंचनामे झाल्यानंतर शासनाकडून मदतीसाठी पाठपुरावा करणार

पाथडीॕ- काल रात्री झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावातील शेतीचे,घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अॕड.प्रताप ढाकणे यांनी याची माहिती उप मुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिली असून नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले असल्याची माहिती केदारेश्वर साखर कारखान्याचे संचालक,युवक नेते रूषिकेश ढाकणे यांनी दिली.

    काल दि.30 आॕगस्टच्या मध्यरात्री पासून तालुक्यातील सर्वच भागांत मुसळधार पाऊस बरसला.काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस कोपला.त्यामुळे अनेक गावांतील नद्यांना पूर येऊन पाणी लोकांच्या घरात,रानात शिरले.अनेकांची गुरे,मोटारसायकली सुध्दा वाहून गेल्या तर अनेक गावांत घरांचीही पडझड झाली.याची माहीती मिळताच केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अॕड.प्रताप ढाकणे पहाटेपासूनच अॕक्शन मोडमध्ये आले.त्यांनी तात्काळ जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना परिस्थितीची कल्पृना देत जिल्हा प्रशासन सजग करायला लावले.त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही अॕड.ढाकणे यांनी शेवगाव व पाथडीॕच्या अतिवृष्टीची माहीती फोनवरून दिली.त्यानंतर पवार यांनी मुश्रीफ यांच्याशी बोलणे करून जिल्हा प्रशासनाला मदतीसाठी आदेश दिले.यानंतर जिल्हाधिकारी स्वतः तातडीने पाथडीॕकडे रेस्यू टीमसह रवाना झाल्याची माहीती ढाकणे यांना देण्यात आली.    तोपर्यंत रूषिकेश ढाकणे यांनी तालुक्यातील शेकटे,आगसखांड,अकोला कोरडगाव,कोळगाव तसेच शेवगाव तालुक्यातील वरूर,भगूर,आखेगाव,वडुले,वाघोली या गावांची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांना धीर दिला.

    ढाकणे म्हणाले,गेल्या वषॕ भरापासून तालुक्यात नैसर्गिक संकट मोठ्या प्रमाणात आली आहेत.कालचा पाऊस प्रचंड प्रमाणात झाल्याने हाताशी आलेली पिके झोपली आहेत.अनेक घरांचेही नुकसान झाले तर अनेकांनी गुरे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली असून वरिष्ठ पातळीवरून पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला मिळाली आहेत.तुताॕस मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून त्यानंतर पृंचनामे करण्यात येतील.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी व पडझड झालेल्या घर मालकांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात प्रशासनाला सहकार्य करावे.उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या माध्यमातून ठोस मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्याचप्रमाणे विमा कंपन्यांच्या माध्यमातूनही शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य करू.लोकांनी धीर सोडू नये आम्ही आपल्या सोबतच आहोत.

       अकोलेतील अनेकांना पावसाचा फटका बसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.याची दखल घेत ढाकणे यांनी अकोलेतील दादापाटील ढाकणे विद्यालयात ग्रामस्थांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या