Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवानगड परिसर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी कृष्णनाथ अंदुरे तर उपध्यक्षपदी सतिष जगताप

 

कार्याध्यक्षपदी - प्रा . दादासाहेब खेडकर

सचिवपदी -महादेव बटुळे 

खजीनदारपदी -शैलेदं जायभाये 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


खरवंडी कासार : भगवानगड परिसर प्रेस कल्बच्या अध्यक्षपदी दै. पुढारीचे पत्रकार कृष्णनाथ अंदुरे तर उपध्यक्षपदी सातिष  जगताप यांची निवड करण्यात आली 

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील प्रिंट मिडीया पत्रकाराची खरवंडी कासार येथे बैठक होऊन प्रेस कल्बची स्थापना करण्यात आली. यावेळी सर्वानुमते भगवानगड परिसर  प्रेस कल्बचे अध्यक्ष म्हणुन कृष्णनाथ अंदुरे यांची निवड झाली. यावेळी कार्यकारणी घोषीत करण्यात आली यामध्ये प्रेस कल्बच्या  उपअध्यक्षपदी    सतिष जगताप ,कार्याध्यक्षपदी  प्रा . दादासाहेब खेडकर सचिव महादेव बटुळे खजीनदारपदी शैलेदं जायभाये यांची निवड झाली. यावेळी कार्यकारणी सदस्य अशोक आव्हाड, नितिन अंदुरे ,चद्रकांत भोसले उपस्थित होते.

जगभरात सध्या कोरोना साथीच्या आजाराने थैमान घातले असताना समाजातील काही व्यक्ती देवदुत म्हणुन या काळात काम करत आहेत,त्यांचा गौरव व्हावा कोरोनाशी जग लढा देत असताना  ज्यांनी कोराना योद्धा म्हणुन काम केले व करत आहेत ,त्यांना प्रोत्साहन म्हणुन अशा कोरोना योद्धाचा  प्रेस क्लबच्या माध्यमातुन येत्या काळात लवकरच खरवंडी कासार येथे  पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्याचे ठरले. या निवडबद्दल अंदुरे व नूतन कार्यकारिनीचे पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या