Ticker

6/Breaking/ticker-posts

तालिबानचा गझनी शहरावर ताबा, अफगाणिस्तान सरकारने; दिला 'हा' प्रस्ताव

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: गृहयुद्धात होरपळून निघत असलेल्या अफगाणिस्तानला हिंसाचारापासून वाचवण्यासाठी अफगाणिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान सरकारने तालिबानला सत्तेत भागिदार होण्याचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमधील सत्तेत सहभागी करून घेत असताना राष्ट्रपती अशरफ गनी यांनी तालिबानसमोर एक अट ठेवली आहे. तालिबानने शहरांवर सुरू असलेले हल्ले थांबवण्याची अट ठेवण्यात आली आहे

अफगाणिस्तानच्या ६५ टक्के भागाचा ताबा तालिबानने घेतला आहे. अनेक शहरे तालिबानच्या हाती गेली आहेत. अफगाणिस्तानमधील आणखी एक महत्त्वाचे शहर गझनी शहरावरही तालिबानने ताबा मिळवला आहे. अशा स्थितीत अफगाण सरकारने तालिबानला प्रस्ताव दिला आहे. अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. अफगाण सरकारचा प्रस्ताव तालिबान मान्य करेल याची शक्यता धुसर असल्याचे म्हटले जात आहे.

गझनी शहरावर ताबा

दरम्यान, गुरुवारी तालिबानने महत्त्वाच्या गझनी शहरावर ताबा मिळवला आहे. मागील एका आठवड्यात तालिबानने आक्रमकपणे हल्ले सुरू केले असून जवळपास १० राज्यांच्या राजधान्यांचा ताबा मिळवला आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरी भागाच्या बाहेर युद्ध सुरू आहे. अफगाणिस्तान सरकार आणि सुरक्षा दलाने गझनी शहरावर तालिबानने ताबा मिळवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही.

दरम्यान, तालिबानने गझनी प्रांताचे राज्यपाल आणि राष्ट्रीय पोलीस प्रमुखांना काबूलला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. राज्यपाल दाऊद लघमनी यांच्या अंगरक्षकांकडे असलेली शस्त्रे तालिबानने काढून घेतली असल्याचे वृत्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या