Ticker

6/Breaking/ticker-posts

नॅशनल हॉर्स रायडर तरुणीची ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


पुणे :नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या तरुणीने नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

श्रीया गुणेश पुरंदरे (वय १७, रा. डी- मधुवंती, नांदेड सिटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीच्या अकराव्या मजल्यावर श्रीया राहत होती. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गॅलरीत व्यायाम करणारे अभिजित देशमुख यांना जोरात खाली काही तरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता त्यांच्या मुलीच्या वर्गात शिकत असलेली श्रीया ही पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती हवेली पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी श्रीयाचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून आत्महत्येचा तपास केला जात आहे. श्रीया हिच्या वडिलांची हॉर्स रायडिंगची अ‍ॅकॅडमी आहे. लहानपणापासून श्रीया हॉर्स रायडिंगचं शिक्षण घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. ती सध्या बारावीत शिकत होती. या प्रकरणी हवेली पोलिस तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या