Ticker

6/Breaking/ticker-posts

संतापजनक ! पुण्यात ऑनलाइन क्लासमध्ये अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडिओ

 
ऑनलाइन क्लासच्या दरम्यान पॉर्न व्हिडिओ सुरू झाला

पुण्यात घडला संतापजनक प्रकार

पोलिसांकडे सखोल तपास करण्याची मागणी

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पुणेः करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णपणे बंद आहेत. गेल्या दीड वर्षांपासून शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग निवडला आहे. मात्र, ऑनलाइन क्लास दरम्यान अश्लील व्हिडिओ सुरू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पुण्यातही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांचा ऑनलाइन वर्ग सुरू असताना पॉर्न व्हिडिओ लावण्यात आला. शुक्रवारी हा प्रकार घडला असून शाळेनं यासंबंधी पोलिसांकडे तक्रार केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.


शुक्रवारी ३० जुलै रोजी शाळेतील एक शिक्षिकेनं ऑनलाइन क्लाससाठी पासवर्ड आणि लॉगिन आयडी विद्यार्थ्यांना दिला होता. इयत्ता पाचवीच्या मुलांनी या लॉगइन-पासवर्डवरुन ऑनलाइन क्लाससाठी उपस्थित झाले होते. शिक्षिका शिकवत असताना अचानक पॉर्न व्हिडिओ सुरू झाला. त्यावेळी वर्गात ३० मुलं उपस्थित होती. तर, काही मुलांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते. ऑनलाइन क्लासच्या दरम्यान पॉर्न व्हिडिओ सुरू झाला.

याप्रकरणी शाळेनं खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शाळेनं विद्यार्थ्यांना दिलेली लिंक -पासवर्ड एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला दिला गेल्याचा संशय पोलिसांना आहे. याव्यक्तीनं या लिंकद्वारे ऑनलाइन क्लास लॉग इन करुन पॉर्न व्हिडिओ सुरू केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

राजगुरू परिसरात असलेल्या खासगी इंग्लिश शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेच्या मुख्यध्यापकांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांची सायबर क्राइमच्या टीमकडून अधिक तपास केला जात आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या