Ticker

6/Breaking/ticker-posts

११ वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; कधी, कशी होणार नोंदणी... जाणून घ्या

 *अर्ज प्रक्रियेला १४ ऑगस्टपासून सुरुवात

*२२ ऑगस्टपर्यंत अर्जांची मुदत








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पुणे : राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी सीईटी रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केला. त्यानंतर एकाच दिवसांत दहावीच्या गुणांवर अकरावी प्रवेशासाठीची नोंदणी सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अर्जातील भाग एक १४ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून, त्यानंतर अर्ज करायचा आहे, अशी माहिती माध्यमिक विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.


या वेळापत्रकानुसार कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी असणाऱ्या जागांची माहिती १७ ऑगस्टला प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना १७ ते २२ ऑगस्ट य़ा कालावधीत अर्जाचा भाग दोन म्हणजे कॉलेजांचे पर्याय भरायचे आहेत. प्राथमिक गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येईल. या यादीबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप आणि तक्रारी असल्यास २३ आणि २४ ऑगस्ट रोजी करता येईल. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. प्रवेशाची गुणवत्ता यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार असून, त्यानुसार विद्यार्थांना कागदपत्रे आणि शुल्क जमा करून २७ ते ३० ऑगस्ट या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या यादीसाठी कॉलेजांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांची माहिती ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती जगताप यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

प्रवेशाच्या पहिल्या फेरीबाबत महत्त्वाचे...

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक : 11thadmission.org.in

अर्ज करण्यासाठी लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करणे

भाग एक भरणे : १४ ते २२ ऑगस्ट

भाग एक व दोन भरणे : १७ ते २२ ऑगस्ट

प्रवेशाची गुणवत्ता यादी : २७ ऑगस्ट

प्रवेश घेणे : २७ ते ३० ऑगस्ट

प्रवेशाची दुसरी फेरी : ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर

प्रवेशाची तिसरी फेरी : ५ ते ११ सप्टेंबर

प्रवेशाची चौथी फेरी : १२ ते १७ सप्टेंबर

असे होतील कोटा प्रवेश

कोटा प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांना १७ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने भाग एक आणि दोन पूर्ण भरायचे आहे. त्यानंतर या अर्जाची प्रिंटआउट घेऊन, ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या ठिकाणी तो द्यायचा आहे. त्यानंतर कॉलेजांकडून प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना वेळापत्रकाप्रमाणेच प्रवेश घ्यावे लागणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या