Ticker

6/Breaking/ticker-posts

'नरेगा'घोटाळ्यातील हलगर्जीपणा भोवला ; बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली

 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

बीड : बीड जिल्ह्यातील 'नरेगा'घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यास हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची तातडीने बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. राधाविनोद शर्मा यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 

राधाविनोद अरिबम शर्मा हिंगोलीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांना आता बीडचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. दरम्यान, नरेगा प्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकाऱ्यांवर थेट बदलीची कारवाई केल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

जिल्ह्यात मागच्या काही वर्षांपासून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत अनेक अनियमितता सुरू होती. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक व ग्राम रोजगार सेवक, ग्राम पंचायत पदाधिकारी यांना हाताशी धरून एका एका गावात कोट्यावधी रुपयाची कामे रोजगार हमी योजनेमधून केली गेली. कुशल कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे लेखापरीक्षणात समोर आले आहे. मनरेगा अंतर्गत झालेल्या या कोट्यवधीच्या अपहारा संदर्भात झालेल्या रकमेचा भरणा संबधितांनी पाच दिवसांत करून या कार्यालयास चलनाची प्रत सादर करावी अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश गटविकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या