Ticker

6/Breaking/ticker-posts

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती: अर्जाची अंतिम मुदत आजच

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू होती. याद्वारे एकू २ हजार ७२५ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी २० ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही मुदत शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही या भरतीसाठी अर्ज केलेला नाही, अशा उमेदवारांसाठी अजूनही संधी आहे.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि पगार हा पदांनुसार वेगळा असणार आहे. आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

कोणत्या पदांची भरती?
सार्वजनिक आरोग्य विभागात (गट-क) अंतर्गत एकूण ५२ पदाच्या एकूण २७२५ जागा भरण्यात येणार आहेत. भंडार नि वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, दूरध्वनीचालक, वाहनचालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्रचिकित्सा अधिकारी, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसोपचार तज्ञ, वार्डन, कनिष्ठ लिपिक, दंतआरोग्यगक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, पेशी तज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शेवटची तारीख
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २० ऑगस्ट २०२१ रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. यानंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या