Ticker

6/Breaking/ticker-posts

Speed ! 'या' देशाने सुरू केली ६०० किमी प्रतितास वेगाने धावणारी ट्रेन

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 बीजिंग: कमी वेळेत अधिक प्रवास करता यावा यासाठी वेगवान वाहने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न होत असतात. चीनने या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. चीनने तब्बल ६०० किमी प्रतितास वेगाने धावणारी मॅग्लेव रेल्वे सुरू केली आहे. ही जगातील सर्वाधिक वेगवान रेल्वे असल्याचे म्हटले जात आहे.

चीनमधील किंगदाओमध्ये या रेल्वेची निर्मिती झाली आहे. विद्युत चुंबकीय बलाचा वापर करून ही ट्रेन धावते. मॅग्लेव ट्रेन ही रेल्वे रूळांवर न धावता हवेत धावते. त्यामुळे कमी प्रमाणात ऊर्जेचा वापर केला जातो आणि ट्रेन वेगाने धावते.

चीन मागील दोन दशकांपासून फारच कमी प्रमाणात, मर्यादित स्वरुपात या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. शांघाईमध्ये एक कमी अंतराचा मॅग्लेव मार्ग आहे. विमानतळ ते शहरादरम्यान हा मार्ग आहे. चीनमध्ये आतापर्यंत इंटरसिटी मॅग्लेव मार्ग नाही. शांघाई, चेंगदूसह काही शहरांमध्ये या मॅग्लेव मार्गाबाबततची पाहणी सुरू झाली आहे.


६०० किमी प्रतितास वेगाने धावणारी ट्रेन बीजिंग ते शांघाईपर्यंतचे अंतर अवघ्या २.५ तासांत कापणार. या दोन्ही शहरातील अंतर १००० किमी आहे. विमानाने प्रवास केल्यास हे अंतर कापण्यास तीन तास लागतात. तर, हाय स्पीड ट्रेनने प्रवास केल्यास ५.५ तास इतका वेळ लागतो. जपान, जर्मनी आदी देशदेखील मॅग्लेव रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्यात अडथळे निर्माण होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या