Ticker

6/Breaking/ticker-posts

अचानक रस्त्यानचं गिळली कार ! पोलीस अडकला ,घट्नेन घबराट ..

 

*रस्ता खचल्यानं गाडीचा अचानक अपघात

*गाडीतून पोलीस कर्मचारी प्रवास करत होता

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच उकाड्यानं होरपळत असलेल्या दिल्ली - एनसीआरच्या रहिवाशांना मान्सूनच्या पहिल्याच पावसानं हैराण करून टाकलंय. दिल्लीच्या अनेक भागांत पाणी साचलेलं दिसून येतंय. सोमवारी पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसानं प्रल्हादपूर, आयटीओ, रिंग रोड सहीत अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. याच दरम्यान द्वारका सेक्टर १८ मधल्या अतुल्य चौकाजवळ घडलेल्या एका घटनेनं अनेक नागरिक धास्तावले आहेत.

अतुल्य चौकात एका चौकात चालत्या गाडीला रस्त्यानं जवळपास अख्खं गिळल्याचं नागरिकांना पाहायला मिळालं. या गाडीतून एक पोलीस कर्मचारी प्रवास करत होता. त्याला आजुबाजुच्या नागरिकांनी सुखरुप गाडीबाहेर काढल्यानं त्याचे प्राण बचावले. त्यानंतर क्रेनच्या मदतीनं गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्राफिक पोलीस शिपाई अश्वनी हे सोमवारी सकाळी अतुल्य चौकाजवळून गाडीतून प्रवास करत होते. याच दरम्यान अचानक जमीन खचली आणि डांबरी रस्त्यातच जमिनीला मोठं भगदाड पडून संपूर्ण गाडीत या भगदाडात सापडली. गाडीचं इंजिन आणि पुढची चाकं जमिनीत घुसली आणि मागची चाकं वर उचलली जाऊन गाडी चक्क उभी राहिली.

गाडीचा मागचा भाग रस्त्याच्या वर थोडा दिसून येत होता. हे पाहताच नागरिक अश्वनी यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी गाडीच्या काचा तोडून त्यांना सुखरुप बाहेर काढलं.

दुसरीकडे, प्रल्हादपूर भागात अंडरपासमध्ये साचलेल्या ५ ते ६ फूट पाण्यात बुडून एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर येतंय. या तरुणाचं वय २७ वर्ष असून त्याचं नाव रवि चौटाला असल्याचं समजतंय. रवि हा दिल्लीच्या जैतपूरचा रहिवासी होता. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या