Ticker

6/Breaking/ticker-posts

संशोधन: करोना संसर्गांनंतर शरीरात 'इतके' महिने अॅण्टीबॉडी !

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 लंडन: करोनाच्या संसर्गाला मात देण्यासाठी विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. तर, दुसरीकडे करोनावर संशोधनही सुरू आहे.कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरामध्ये नऊ महिन्यांपर्यंत प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडी) राहतात, असा निष्कर्ष एका संशोधनामध्ये काढण्यात आला आहे. या संशोधनामध्ये इटलीतील एका संपूर्ण गावातून माहिती संकलित करण्यात आली होती.

पडुआ विद्यापीठ आणि लंडनमधील इम्पेरियल कॉलेजमधील संशोधकांनी यासाठी संशोधन केले. वो नावाच्या या गावाचा अभ्यास करण्यात आला. सुमारे तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावातील ८५ टक्के नागरिकांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये नागरिकांची गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये चाचणी घेण्यात आली. त्यानंतर मे आणि नोव्हेंबरमध्येही नोंदी घेण्यात आल्या. त्यानुसार, नोव्हेंबरमध्येही या नागरिकांच्या शरीरामध्ये लक्षणीय प्रमाणात अँटिबॉडी दिसून आल्या. विशेष म्हणजे लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या दोन्ही रुग्णांमधील अँटिबॉडीच्या प्रमाणात फार फरक दिसून आला नाही.

इम्पेरियल कॉलेजमधील इलारिया डोरिगट्टी म्हणाल्या, ‘लक्षणे असणाऱ्या आणि नसणाऱ्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांमधील अँटिबॉडीचे प्रमाण सारखेच दिसून आले. त्यामुळे, रोगप्रतिकारक शक्ती ही लक्षणे किंवा संसर्गाच्या तीव्रतेवर अवलंबून नाही, हे सिद्ध होते.

या संशोधनातील निष्कर्षानुसार, चारपैकी एका व्यक्तीमुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही संसर्ग झाला. तसेच, एखाद्या व्यक्तीकडून मोठ्या गटाला संसर्ग झाल्याचे प्रकारही दिसून आले नाहीत.


दरम्यान, करोनाचा विषाणू स्वरुप बदलत असल्याचे शास्त्रज्ञांसमोरील आव्हाने वाढली आहेत. करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा वेरिएंटवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या