Ticker

6/Breaking/ticker-posts

नौदल अकादमी Result: लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, इथे तपासा

 *अधिकृत वेबसाइटवर मिळेल माहिती.

*अधिक माहितीसाठी ईमेल आयडी वर सम्पर्क करा.लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्लीः  Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे १८ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या नौदल अकादमी (I)च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालाच्या आधारे २ जानेवारी २०२२ पासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या नौदल, तसेच वायुदलाचा १४७ वा अभ्यासक्रम तसेच भारतीय नौदल अकादमी (INAC)च्या १०९ वा अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी उमेदवारांची निवड झाली आहे. हा निकाल आयोगाची वेबसाइट www.upsc.gov.in उपलब्ध आहे.


निवडल्या गेलेल्या उमेदवारांनी लेखी परीक्षा निकालाच्या दोन आठवड्यांच्या आत भारतीय सैन्य भरतीची वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन स्वत:ची ऑनलाइन नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. यानंतरच उमेदवारांना सेवा निवड बोर्ड (एसएसबी) निवडकेंद्र आणि मुलाखतीची तारीख दिली जाईल. याची सूचना अधिकृत ईमेल आयडीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. लॉगिन संदर्भात काही अडचणी असल्यास dir-recruiting6-mod@nic.in वर ई-मेल पाठवू शकता.

रिझल्ट पाहण्यासाठी उमेदवार https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/NDA-  या लिंकवर जाऊ शकतात. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे.

उमेदवारांनी आपले वय तसेच शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील मूळ प्रमाणपत्र सेवा निवड बोर्डाला प्रत्यक्ष मुलाखतीदरम्यान दाखवावे. उमेदवारांनी आपले ओरिजनल कागदपत्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला पाठवू नयेत. इतर कोणत्याही मदतीसाठी सकाळी १० ते ५ दरम्यान आयोगाच्या गेट 'सी'जवळ सुविधा काऊंटरवर येऊन किंवा ०११-२३३८५२७१/०११-२३३८११२५/०११-२३०९८५४३ वर संपर्क करु शकतात.

उमेदवारांची गुणपत्रिका अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर केली जाईल आणि ३० दिवसांसाठी वेबसाइटवर उपलब्ध असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या