Ticker

6/Breaking/ticker-posts

आश्चर्यकारक- धक्कादायक: ‘ कलम 66A रद्द होऊनही त्या अंतर्गत गुन्हे दाखल’ - सुप्रीम कोर्ट

 लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नवी दिल्लीः आयटी कायद्यातील कलम ६६-अ हे रद्द होऊनही त्यानुसार गुन्हे दाखल होत असल्यावर सुप्रीम कोर्टाने  तीव्र नाराजी व्यक्त केली. कलम 66A हे रद्द होऊनही त्या अंतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. ही बाब आश्चर्यजनक आणि धक्कादायक आहे. तसंच त्रासदायकही आहे. यामुळे कोर्ट या प्रकरणी पाऊल उचलेल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी करत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. केंद्र सरकारला यासाठी सुप्रीम कोर्टाने २ आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

IT ACT मधील 66A अंतर्गत कारवाई होत असल्याने PUCL कडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. २४ मार्च २०१५ ला IT ACT मधील 66A हे कलम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलं होतं. तरीही या कलमानुसार एफआयआर दाखल करणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांना यासंदर्भात सूचना जारी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कुठेही या कलमानुसार एफआयआर दाखल करू नये अशी सूचना केंद्र सरकारने जारी करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली.


एनजीओ (NGO PUCL) ने ही याचिका दाखल केली आहे. एफआयआर तपासासंबधी सर्व डेटा एकत्र करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, असं पीयूसीएलने याचिकेत म्हटलं आहे. ज्या ठिकाणी कलम 66A लागू केला गेला आणि देशातील कोर्टात प्रलंबित खटल्यांप्रकरणी ही हा डेटा गोला करण्याची मागणी पीयूसीलने केली आहे. श्रेया सिंघल प्रकरणी सुप्रीम कोर्टाने IT ACT मधील कलम 66A हे घटनाबाह्य असल्याचे नमूद करत ते रद्द केले होते.

आयटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. यासंबंधी कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. या कलमावरून सोशल मीडियात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याला कोर्टाने महत्त्वाचं मानलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या