लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आयसीसीने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठीचे दोन ग्रुप जाहीर केलेत. ग्रुप २ मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान हे संघ आहेत. तर ग्रुप १ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात १९ मार्च २०१६ रोजी अखेरची टी-२० लढत झाली होती. तेव्हा टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाता येथील लढतीत भारताने पाकिस्तानचा ६ विकेटनी पराभव केला होता.
आयसीसीच्या स्पर्धेत कोणत्याही सामन्यापेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत सर्वाधिक पाहिली जाते. आतापर्यंत झालेल्या ६ टी-२० वर्ल्डकपमध्ये फक्त दोन वेळा २००९ आणि २०१० मध्ये या दोन्ही संघात लढत झाली नाही. २००७च्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांत फायनलसह दोन लढती झाल्या होत्या. २०१२ मध्ये सुपर-८ आणि २०१४ व २०१६ मध्ये ग्रुप फेरीत या दोन्ही संघात लढती झाल्या होत्या.
0 टिप्पण्या