Ticker

6/Breaking/ticker-posts

टी-२० वर्ल्डकप: १३ वर्ष टीम इंडिया अपराजित; भारताविरुद्ध पाककडे भोपळा

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्ली: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये संपूर्ण क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असलेली भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आयसीसीने वर्ल्डकपसाठीचे दोन ग्रुप आज जाहीर केले. त्यात भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवले आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही देशात किमान एक तरी लढत होणार हे निश्चित आहे. पाकिस्तान शिवाय भारताच्या गटात न्यूझीलंड, अफगाणिस्थान यांचा समावेश आहे. या शिवाय अन्य दोन संघ हे पात्रता फेरीतील निकालानंतर ठरतील.


राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय लढत होत नाहीत. यामुळे आयसीसीच्या स्पर्धेतील दोन्ही देशातील लढती या अधिक चुरशीच्या होतात. वर्ल्डकपमधील भारतीय संघाची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी ही अफलातून अशी आहे. आयसीसीच्या वनडे, टी-२० आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तिनही स्पर्धेचा विचार केल्यास दोन्ही संघात आतापर्यंत १७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १३ लढती भारताने तर ४ लढती पाकिस्तानने जिंकल्या आहेत.

वनडे वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या एकाही लढतीत पाकिस्तानला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. या दोन्ही संघात वनडे वर्ल्डकपमध्ये सात लढती झाल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत ५ पैकी २ लढती भारताने तर ३ लढती पाकिस्तानने जिंकल्या आहेत. टी-२० वर्ल्डकपचा विचार केल्यास पाकिस्तानकडे शून्याशिवाय काही नाही. या स्पर्धेत दोन्ही संघात पाच लढती झाल्या आहेत त्यापैकी सर्व भारताने जिंकल्या आहेत. यात एक मॅच टाय झाली होती जी भारताने बॉल आउटमध्ये जिंकली होती. पाकिस्तानला १३ वर्षात टी-२० वर्ल्डकपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या ग्रुपमध्ये असलेल्या अन्य संघांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन लढतीत भारताचा पराभव झाला. तर आफगाणिस्तान विरुद्धच्या दोन्ही लढतीत विजय मिळवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या