Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेना इलेक्शन मोडवर; शिवसेनेना नेते खैरे व आमदार दानवे यांचे स्वतंत्र अभियान जोमात लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

औरंगाबाद: औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काही महिन्यात लागण्याची शक्यता आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेने बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे एक तर जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांचे आणखी एक अभियान अशा दोन अभियानांच्या माध्यमातून पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेली शिवसेना आता इलेक्शन मोडवर आली आहे.

 

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने तसेच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेने या अभियानाचा उपयोग महापालिका निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी करून घेतल्याचे चित्र आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान सुरू केले. दानवे यांच्यासोबतच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही अभियान सुरु केले. या दोन्हीही नेत्यांच्या अभियानाने ग्रामीण भागासह शहरातही गती घेतली आहे.

दानवे यांनी शहराशी संबंधित असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेत पदाधिकारी-कार्यकर्त्यांना कामाला लावण्याचे नियोजन केले तर खैरे यांनी काही वॉर्डांमध्ये बैठका घेत आपली छबी पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये कायम राहील, असा प्रयत्न सुरू केला आहे. पदाधिकारी-कार्यकर्ते मात्र दोन्हीही नेत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. पक्षसंघटन मजबूत होत असल्याची भावना त्यांच्यातून व्यक्त होत आहे. पालिकेची निवडणूक डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या दृष्टीने साखरपेरणी करण्याचे काम शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून होत असल्यामुळे शिवसेना इलेक्शन मोडमध्ये आल्याचे मानले जात आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या