Ticker

6/Breaking/ticker-posts

संदेश कार्लेंमुळे बुरुडगावमधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी – भगवान फुलसौंदर

 


 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: नगर शहराचे उपनगर असलेल्या  बुरुडगाव मधील सर्व रस्ते महामार्गाला जोडलण्याचे काम  जि. प. सदस्य संदेश कार्ले यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून केल्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणासाठी सोयीस्कर रस्ते तयार झाले आहे. व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांनाही आपला माल इतर ठिकाणी नेण्यासाठी फायदा होणार असल्याचे प्रतिपादन माजी महापौर भगवान  फुलसौंदर यांनी केले.

 

नगर तालुक्यातील बुरुडगाव येथील जाधव मळा येथे जाणाऱ्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच बापुसाहेब  कुलटअरुण शिंदेबबलू शेखजालिंदर कुलटप्रदीप बरबडेशिवाजी राऊतबाळासाहेब जाधवमंगेश झिनेखंडू काळेगणेश दंरदलेविठठल जाधवविष्णूदास जाधवमहेश जाधवसंजय म्हस्के आदी उपस्थित होते.

 

यावेळी संदेश कार्ले म्हणाले की, जाधव मळा येथे जाण्यासाठी नागरिकांना रस्त्याअभावी सीना नदी ओलांडून जावे लागत होते. नदीला पुर आल्यावर पुलावरील मुरुम वाहून जात होता. पुलाला खड्डे पडले होते. पुर आला तर शेतकऱ्यांची सर्वच कामे खोळबंत होती. रस्त्याअभावी मुलांना शाळेत जाता येत नव्हते. या पुलासाठी बऱ्याच दिवसापासून नागरिकांचा  पाठपुरावा सुरु होता. जिल्हा परीषदेमध्ये वारंवार पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे संदेश कार्ले यांनी सांगितले. या पुलामुळे जाधव वस्तीमधील नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला याचे समाधान असल्याचे त्यांनी संगितले .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या