Ticker

6/Breaking/ticker-posts

‘थोरातसाहेब, जेवायला बोलवा; आम्ही स्वबळावर येऊ’

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

  मुंबई :राज्यातील सत्तेत असतानाही काँग्रेसने आगामी महापालिका निवडणूका स्वबळावर लढवण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. साहजिकच यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यावरून थेट काही बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी गंमती गंमतीत काँग्रेसला या मुद्यावरून चिमटे काढले. ' बाळासाहेब थोरातसाहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर जेवायला येऊ,' असे म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या चिमटा काढला.

माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्काराचे वितरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी आघाडीचे मंत्री उपस्थित होते. या वेळी अजित पवारांचे भाषण झाले. या भाषणात पवारांनी जेवणाचा विषय काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी अजितदादांच्या भाषणातील जेवणाचा धागा पकडून तुफान फटकेबाजी केली. ' दादा तुम्ही जेवणाचा विषय काढला. थोरात साहेब म्हणाले करोनामुळे जमले नाही. थोरात साहेब, तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा. करोनाची भीती बाळगू नका. आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू,' असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना काढताच सभागृहात एकच हशा पिकला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच सारवासारव केली.  ' स्वबळाचा अर्थ म्हणजे आम्ही न भिता जेवायला येऊ. नाही तर  उद्या जेवणावरून आघाडीत बिघाडी असे काही छापून यायचे. असे काही नाही. हा गंमतीचा भाग आहे,' असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या