Ticker

6/Breaking/ticker-posts

बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी २७ जुलैपर्यंत करा नोंदणी

 

*२७ जुलैपर्यंत करा ऑनलाइन नोंदणी

*अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर जा



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

  मुंबई :MAH BEd  CET 2021: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET सेल) दोन वर्षाच्या  बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटीची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरु आहे. दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या CET चे फॉर्म १३ जुलै २०२१ पासून सुरु झाले आहेत. उमेदवारांना २७ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. बी. एड. करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे.


अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट http://cetcell.mahacet.org/ किंवा https://www.mahacet.org/cetcell/ जाऊन माहिती मिळवू शकतात. यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना या वेबसाइटवर हॉल तिकिट मिळणार आहे. याची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

सीईटी सेलकडून उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत नव्हते. याबाबत माध्यमानी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सीईटी सेलकडून विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक जाहीर करण्याला सुरुवात झाली आहे. चार वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम असल्याने, त्याला प्रवेश घेण्य़ासाठी विद्यार्थी पसंती देतात.

या परीक्षेला अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाला ८०० रुपये शुल्क; तर राखीव प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क आहे. या सीईटीबाबत अधिक माहिती सीईटी सेलच्या www.mahacet.gov वेबसाइटवर उपलब्ध आहे. दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची आणि परीक्षेची तारीख काही दिवसानंतर जाहीर करणार असल्याचे सेलकडून सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या