Ticker

6/Breaking/ticker-posts

बनावट सोने प्रकरणाचा बळी ? नगर अर्बन बँकेचे शाखाधिकारी गोरक्षनाथ शिंदे यांची आत्महत्या

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

शेवगाव : नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. २७ रोजी दुपारी ३-३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली गेली आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी गेल्याबद्दल शेवगाव बाजारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे 

    याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) हे दि. ३१  मे २०२१ रोजी सेवा निवृत्त झाले होते. मात्र बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिण्यासाठी वाढवून दिला होता.

आज मंगळवार दि. २७ रोजी सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे हे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला असता दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास  शेतामध्ये त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. सदर घटनेची खबर शेवगाव पोलीस ठाण्यात मयताचे चुलत भाऊ कचरू तुकाराम शिंदे यांनी दिली आहे 

 याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. या दुदैवी घटनेची माहिती शेवगाव  तालुक्यास जिल्ह्यात समजताच एकच खळबळ उडाली. 

आत्महत्येपुर्वी गोरक्षनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकले नाही. यामुळे चिठ्ठीत कोणाचे नाव आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत पोलिसांकडून मौन पाळले जात आहे. यात कोण दोषी कोण याची जनतेत चर्चा होती. दरम्यान मयत शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असुन तीत गोल्ड व्हँल्युअर व खातेदार यांनी फसवणुक केलेली आहे. माझा यात काहीही दोष नाही. माझी फसवणुक झालेली असून कृपया मला माफ करावे. अशा आशयाचा मजकुर आढळून आला असल्याची माहिती आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या