Ticker

6/Breaking/ticker-posts

महापुरावरील नियंत्रणासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांची मोठी घोषणा

 *महापुराचे पाणी अडवण्यासाठी जल आराखडा तयार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडच्या तळीये गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

*डोंगरभागात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करणार








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 महाड: राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. राज्याला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागत असून महापुराचे पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करण्याची घोषणा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.


राज्यात दरवर्षी अतिवृष्टी होत असते. यामुळे आलेल्या महापुरामुळे सर्व प्रकारच्या हानीला राज्याला तोंड द्यावे लागते. यासाठी वॉटर मॅनेजमेट म्हणजेच 
जल व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यतक असून त्यासाठी राज्य सरकारने जल आराखडा तयार करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडच्या तळीये गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राज्याचा जल आराखडा तयार करण्याची घोषणा त्यांनी केली.

अतिवृष्टीच्या काळाच पाण्याचे व्यवस्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी रायगडमधील महाड, रत्नागिरीतील चिपळून, सांगली आण कोल्हापुरात पाणी भरत असते. या ठिकाणच्या पाण्याचे व्यवस्थापन होणे अत्यंत आवश्यक आहे. आता झाल्या त्या प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत आणि जर अशी अतिवृष्टीची परिस्थिती ओढवली तर त्यामुळे मनुष्यहानी होऊ नये यासाठी हे व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

डोंगर भागात राहणाऱ्या नागरिकांचे करणार पुनर्वसन

अतिवृ्ष्टीच्या काळात डोंगरभागात राहणाऱ्या नागरिकांचे सर्वाधिक नुकसान होत असते. हे लक्षात घेता आता डोंगरभागात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी तळीयेकरांना दिली धीर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या महाड तालुक्यातील तळीये गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण गावची पाहणी केली. तसेच तेथील गावकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की
, तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा असून आता तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. सरकार तुमचे योग्य प्रकारे पुनर्वसन करेल. सर्वांना मदत दिली जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या