Ticker

6/Breaking/ticker-posts

दुबईत मराठी माणसाचे नशीब पालटलं; तब्बल ७.४५ कोटींची लॉटरी लागली !

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

दुबई: संयुक्त अरब अमिरातीमध्ये नोकरी करून कोट्याधीश होण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. मात्र, त्यातील काही जणांचेच स्वप्न पूर्ण होते. दुबईत काही तासांसाठी थांबलेल्या एका मराठी माणसाचं नशीब चांगलेच जोरावर होते. या मराठी माणसाला दुबईने करोडपती बनवले. त्याला तब्बल ७.४५ कोटींची लॉटरी लागली. ' गल्फ न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील ठाण्यामधील गणेश शिंदे यांना ही लॉटरी लागली. गणेश शिंदे यांनी १६ जून रोजी 'दुबई ड्युटी फ्री मिलेनियम मिलेनियर आणि फायनेस्ट सरप्राइज ड्रॉ या वेबसाइटवरून जॅकपॉटची लॉटरी काढली होती. 

शिंदे हे ब्राझीलमधील एका कंपनीसाठी नाविक म्हणून काम करतात. रिओ दि जिनरियोला जाण्यासाठी दुबईला ट्रान्सिस्ट थांबा मिळतो. दुबईला आल्यानंतर जॅकपॉट लागला असल्याची माहिती त्यांना मिळाली. गल्फ न्यूजला त्यांनी सांगितले की, एवढी मोठी रक्कम मिळाली आहे. यावर अद्यापही विश्वास बसत नाही. माझ्यासाठी ही मोठी संधी असून मी खूप खूश असल्याचे त्यांनी म्हटले. मागील दोन वर्षांपासून गणेश शिंदे लॉटरी खरेदी करत होते. त्यांनी सांगितले की, या रक्कमेतून कार आणि घर खरेदी करणार आहेत. त्याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम खर्च करणार आहेत. मिलेनियम मिलेनियर लकी ड्रॉची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती. गणेश शिंदे हे या लॉटरीचे १८१ वे भारतीय विजेते आहेत. भारतीयांकडून या लॉटरीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते.

काही दिवसांपूर्वीच ३७ वर्षीय एका भारतीय चालकाचेही नशीब असेच बदलले होते. केरळमधील रहिवासी असणारा आणि अबूधाबीत वाहन चालक म्हणून काम करणारे रंजीत सोमराजन यांनाही दोन कोटी दिरहमची (जवळपास ४० कोटी रुपये) लॉटरी लागली. मागील तीन वर्षांपासून रंजीत सोमराजन लॉटरी खरेदी करत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या