Ticker

6/Breaking/ticker-posts

मुंबईची झाली तुंबई; मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : मुंबईसह उपनगरांत पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सखल भागांत पाणी साचलंय. हिंदमाता, बीआयटी चाळ परळ, लालबाग, चिंचपोकळी..आदींसह इतर भागांतही पावसाचं पाणी तुंबलं आहे. मुंबई आणि उपनगरांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.हवामान विभागानं मुंबईसाठी 'यलो अलर्ट' जारी केलंय. 

राजधानी मुंबईसह आसपासच्या शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. फोर्ट परिसर, कल्याण, भांडूप या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात ढगांनी मोठी दाटी केली आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जोरदार पावसामुळे शहरातील हिंदमाता आणि इतर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. ' उपग्रह चित्रात मुंबई, ठाण्यासह कोकणात ढगांची दाटी दिसत असून द. मध्य  महाराष्ट्रातही मोठे ढग दिसत आहेत,' अशी माहिती हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत दिली आहे. दरम्यान, रात्रभर मुंबईत पावसामुळे रविवारी शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या