Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसैनिकांना पोरकेपणा जाणवू देणार नाही-मंत्री शंकरराव गडाख

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

करंजी/ पाथर्डी : तालुक्यातील शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणारे जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे व शिवसेनेचे जेष्ठनेते मोहनराव पालवे यांच्या निधनामुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती परंतु यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांना कोणत्याही प्रकारचा पोरकेपणा जाणवू देणार नाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माझ्यासह संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यानी दिली.

काल शिवसंपर्क अभियानाची करंजी येथुन सुरवात करुन पाथर्डी येथेही कार्यक्रम पार पड्ले. या दोन्ही ठिकाणी ना. गडाख यानी शिवसैनिकाना आश्वस्त केले.

 करंजी येथे शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रफिक शेख यांनी शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाचे उस्फुर्त नियोजन केल्याने या अभियानाची करंजी सारखे गावातून चांगली सुरू झाल्याचे समाधान मंत्री शंकराव गडाख यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने राज्यात सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात करंजी येथून झाली. यावेळी शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना खेवरे, दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शिवसेना नेते डॉ विजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई कराळे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके, उपतालुकाप्रमुख भारत वांढेकर, सुरेश वाघ, पंकज लांबहाते, शिवसेना नेते उद्धव दूसंग, एकनाथ झाडे, भागिनाथ गवळी, जगदीश सोलाट, सुधाकर वांढेकर, शिवाजी मचे, दिलीप वांढेकर, सरपंच सतीश कराळे, प्रमोद गाडेकर, विलास टेमकर, गणेश पालवे, प्रकाश जगदाळे, अरुण भंडारे, किरण जाधव, गोकुळ लोंढे, बाळासाहेब घुले, बाळासाहेब कराळे, अशोक मिसाळ, गणेश तुपे, अंबादास टेमकर, बाळासाहेब टेमकर, अंबादास वारे, शरद गवळी, लक्ष्मण भानगुडे, सुरेश बर्फे, दत्तू कोरडे, सुनील कोरडे, शुभम गीते, भाऊसाहेब पालवे, मिठू पालवे, अशोक गुंजाळ, गुलाब जरे, संतोष कासार, शशिकांत होळकर, सागर पोटे, अक्षय तांदळे, सोमनाथ पोटे, रामचंद्र सिपंनकर,बाबासाहेब गवते, कैलास दुतारे, करंजीचे ज्येष्ठनेते शरदराव अकोलकर, अशोकराव अकोलकर, बाबासाहेब क्षेत्रे, बाबासाहेब आकोलकर, भानुदास आकोलकर, रावसाहेब मुरडे, ग्रामपंचायत सदस्य रोहित आकोलकर, बाबासाहेब गाडेकर, सुनील आकोलकर, जालिंदर वामन यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पाथर्डी येथील शिवसंपर्क अभियान

 गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डीत शिवसेना पक्षाचा शिवसंपर्क अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलतांना गडाख म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांना शपथ घेऊन काम करण्याचा हा फक्त सहा महिन्याचा कालावधी होता. त्यानंतर कोरना सारख्या आजाराने डोके वर काढल्याने राज्य सरकारपुढे प्रचंड मोठी अडचण निर्माण झाली. विकास कामावरचा पैसा आरोग्य विभागाकडे वळून प्रसंगी कर्ज काढून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी  प्राधान्य दिले.कोरोनाच्या काळामध्ये अनेक अडथळे येत असतानाही आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यास सरकारने भर दिला. असे गडाख यांनी सांगून मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून पाथर्डी दुष्काळी तालुक्यांना ४१ साठवण तलाव व ७० पाझर तलाव अश्य दुरुस्तीच्या कामांसाठी जलसंधारण खात्याकडून सुमारे २६ कोटी रुपये देण्यात आले असून आगामी दोन वर्षात हे सर्व प्रकल्प दुरुस्त होणार आहे. असे प्रतिपादन केले.

 यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ विजय पाटील,जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी,जिल्ह्या उपप्रमुख रामदास गोल्हार,महिला जिल्ह्या संघटक मंगल म्हस्के,प्रवीण अनभुले,शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक भगवान दराडे,पाथर्डी तालुका प्रमुख अंकुश चितळे,शेवगाव तालुका प्रमुख अविनाश मगरे,माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, तालुका प्रमुख सविता ससे, जेष्ठनेते एकनाथ कुसळकर,नवनाथ चव्हाण,मीरा बडे,राजेंद्र म्हस्के, सुनील पालवे, सागर राठोड,भारत लोहकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुष चितळे तर आभार अविनाश मगरे यांनी मानले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या