Ticker

6/Breaking/ticker-posts

डेल्टा वेरिएंटचे थैमान, मध्य-पूर्व देशांमध्ये करोनाची चौथी लाट..

 *जगभरात करोना महासाथीचे थैमान सुरू

*करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली


 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 जिनिव्हा: करोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे करोनाचा विषाणू स्वरूप बदलत असल्याने शास्त्रज्ञांसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तर, मध्य-पूर्वेतील देशांमध्ये डेल्टा वेरिएंटमुळे चौथी लाट आल्याचे चित्र असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी म्हटले की, भूमध्य क्षेत्रातील अनेक देशांमध्ये करोनाच्या डेल्टा वेरिएंटमुळे करोनाबाधितांच्या संख्येने वाढ होत आहे. डेल्टा वेरिएंटमुळे करोना मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. मध्य-पूर्व भागातील २२ पैकी १५ देशांमध्ये करोनाच्या डेल्टा वेरिएंटने थैमान घातले आहे.

मध्य-पूर्व भागातील देशांमधील बहुतांशी जणांना डेल्टा वेरिएंटची लागण झाली असल्याचे म्हटले जात आहे. या देशांमध्ये करोना लसीकरणाचा वेग अतिशय कमी आहे. त्याच्या परिणामी बाधितांची संख्या वाढत आहे. बाधितांपैकी बहुतांशीजणांनी करोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रीय संचालक डॉ. अहमद अल-मंधारी यांनी सांगितले की, डेल्टा वेरिएंटमुळे करोना संसर्ग वेगाने होत आहे. डेल्टा वेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. बहुतांशी नवीन करोनाबाधित आणि रुग्णालयात दाखल झालेले करोनाबाधित यांनी लस घेतलेली नाही. संपूर्ण मध्य-पूर्व भागात करोनाच्या चौथ्या लाटेच्या दारात उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या