Ticker

6/Breaking/ticker-posts

पोर्नोग्राफी प्रकरण : शिल्पाला 'सुपर डान्सर ४' सह अनेक प्रोजेक्टवर सोडावं लागेल पाणी..

 *सुपर डान्स ४ कार्यक्रमात शिल्पा शेट्टी दिसणार नाही
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टीच्या समोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शिल्पा शेट्टीने काम केलेला 'हंगामा २' हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. तब्बल १४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शिल्पा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसली होती. हा क्षण तिला मोठ्या उत्साहात साजरा करायचा होता. परंतु तिच्या नवऱ्याला राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली. त्यानंतर तिच्या सर्व स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले गेले आहे. इतकेच नाही तर सुपर डान्स ४ या रिअॅलिटी कार्यक्रमात शिल्पा परीक्षक म्हणून दिसायची. आता या कार्यक्रमातही पुढचे काही दिवस दिसणार नाही.

शिल्पाच्या सहभागाबद्दल अनिश्चितता
ई- टाइम्सच्या बातमीनुसार शिल्पा सुपर डान्सर ४ कार्यक्रमाचा आजही हिस्सा आहे. ती लवकरच परत येईल, अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. शिल्पाच्या अनुपस्थितीमध्ये गीता कपूर आणि अनुराग बासू हे दर आठवड्याला येणाऱ्या खास पाहुण्यांसोबत या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

या कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून डान्सची आवड असलेले स्पर्धक सहभागी झाले आहे. या कार्यक्रमातून ते आपली कला सर्वांसमोर सादर करतात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या आठवड्यामध्ये या कार्यक्रमात रितेश देशमुख आणि त्याची बायको आणि अभिनेत्री जेनेलिया डिसुझा खास पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. तर पुढच्या आठवड्यामध्ये मौसमी चॅटर्जी, सोनाली बेंद्रे विशेष पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. गेल्या आठवड्यामध्ये अभिनेत्री करिष्मा कपूर सहभागी झाली होती.

 दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या समर्थन करणाऱ्या दोन पोस्ट तिच्या बहिणीने शमिताने शेअर केल्या आहेत. दोन्ही वेळेला युझर्सनी तिला खूप ट्रोल केले. शिल्पाने क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राच्या या कामाबद्दल, त्याच्या अॅपबद्दल तिला काहीही माहिती नव्हते. त्याचवेळेला शिल्पाने राज कुंद्राचा बचावदेखील केला आहे. राज हा पॉर्न फिल्म नाही तर एरॉटिक फिल्म बनवायचा असे तिने पोलिस तपासात सांगितले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या