Ticker

6/Breaking/ticker-posts

रस्त्यात लुटमार करणा-या आरोपींना नेवासा पोलिसांनी बारा तासात केले जेरबंद.

 *सहा जणांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

*पोलीस निरीक्षक विजय करे यांची पत्रकार परिषदेत माहिती


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नेवासा:  १८ जुलै रोजी सुधीर रमेश कुमावत हे श्रीरामपूर येथे जाण्यासाठी गाडीची वाट पाहात होते. त्यावेळी एक स्विफ्ट गाडी आली. श्रीरामपूरला  यायचे का? असे विचारले वरून कुमावत गाडीत बसले मात्र ती गाडी श्रीरामपूर कडे न नेता औरंगाबादकडे निघाली. रस्त्यात गाडीतील पाच जणांपैकी चौघांनी सुरीचा धाक दाखवून साडे पाच हजार रुपये रोख,चांदीचे कडे, मोबाइल हिसकावून घेतला  हिरा पेट्रोल पंप प्रवरासंगम येथील कामगारास फोन पे वरून 25000 रु वर्ग करून रोख घेतले तसेच कुमावत यांस रस्त्यातच सोडून दिले होते .

 गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा संतोष अशोक इंगोले रा. सरस्वती ता. लोणार जि. बुलढाणा याने केल्याची खात्री झाली. त्यास ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली देत साथीदार गणेश रामदास भागडे,उमेश विष्णू शिंदे,गोविंद संतोष लहाने अविनाश प्रकाश शिंदे सर्व रा. लोणार जि. बुलढाणा असे आहेत. गुन्हा करताना त्यांनी स्विफ्ट गाडी  क्र 01 बी. एफ. - 0104 वापरली होती.   हिरा पेट्रोल पंप येथे पैसेची मदत करणारा किशोर भास्कर लांडे यांस आरोपी करण्यात आले आहे. त्याच्याकडून मुद्दे माल हस्तगत करण्यातआलाआहे

अशोक इंगोले याच्यावर चार तर अविनाश शिंदे याच्यावर सात ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत  आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील , उपविभागीयपोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे,यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीसनिरीक्षक विजय करे,उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे,पो. ना. राहूल यादववसीम इनामदार,गुंजाळ, भागवत  शिंदे यांनी मिळून ही कारवाई केली. अवघ्या बारा तासात आरोपींना गजा आड करण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या