Ticker

6/Breaking/ticker-posts

पडळकरांच्या कारवर दगडफेक: रोहित पवार यांनी केले 'हे' मोठे विधान

 *पडळकर कारवर दगड फेक प्रकरणी रोहित पवारांनी दिले उत्तर.

*दगड मारणाऱ्याच्या भावनाही समजून घ्यायला हव्या.लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नगर: ‘भाजप आमदार गोपीचंद पडळकर एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. त्यांना उत्तर देणे म्हणजे आपणही खालच्या पातळीवर गेल्यासारखे आहे. त्यांना तर पद यासाठीच देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याचा खटाटोप कुणी करत नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी पडळकर यांची खिल्ली उडविली आहे. पडळकर यांचे वक्तव्य योग्य आहे का हे त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या नेत्यांनीच तपासून सांगावे. त्यांना हे पटत असेल तर प्रश्नच संपला’, असेही रोहित पवार म्हणाले.


गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका, त्यानंतर पडळकर यांच्या गाडीवर झालेली दगडफेक, त्यातील हल्लेखोर राष्ट्रवादी काँग्रेसचा असल्याचा पडळकरांचा आरोप या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. रोहित पवार म्हणाले, ‘पडळकर यांनी जे वक्तव्य केले आहे. ते कोणालाही विचारले तरी चुकीचे असल्याचे सांगतील. आपल्या राज्याची ही संस्कृती नाही. मात्र, पडळकरांना हे कोण सांगणार? त्यांना आमदारपद पवारांवर टीका करण्यासाठीच देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना पाठिशी घालणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच एकदा पडळकर यांच्या या वक्तव्यावर विचार करावा, ते योग्य आहे की अयोग्य हे त्यांनीच सांगावे. पडळकर एवढ्या खालच्या भाषेत टीका करीत आहेत, की त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्यालाही त्या पातळीवर जावे लागेल. तसे झालं तर लोक आपल्यालाच नावे ठेवतील. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याच्या खटपटीत कोणी पडत नाही. त्यांच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा दोन दगड घेऊन ते एकेमेकांवर आपटले तर त्यातून आग निर्माण करण्याचे तरी काम होऊ शकेल’, अशा भाषेत पवार यांनी पडळकरांची खिल्ली उडवली.

...त्या तरुणाच्या भावनाही समजून घेतल्या पाहिजेत!

सोलापूरमधील दडगफेकीच्या घटनेबद्दल पवार म्हणाले, ‘त्या तरुणाने जे केले ते चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करता येणार नाही. मात्र, त्यामागील त्याचा विचारही समजून घेतला पाहिजे. पडळकर यांच्या वक्तव्याबद्दल कोणत्याही महिलेला किंवा नेत्याला विचारले तर तेही चुकीचे म्हणतील. जर हे चुकीचे वाटत असेल म्हणून त्या तरुणाने हे कृत्य केले असेल तर त्याच्या मागील त्याच्या तीव्र भावना समजून घेतल्या पाहिजे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे. त्यांच्या मोठ्या नेत्यांनी यावर बोलावे. तेच पडळकरांना यासाठी पुढाकार घ्यायला लावतात. जर भाजपच्या नेत्यांना पडळकरांचे व्यक्तव्य योग्य वाटत असेल तर आमचे काहीच म्हणणे नाही. टीका करण्यासाठीच पडळकरांना पद दिले असेल तर ते चांगले काम करत आहेत, असे म्हणावे लागले,’ असा टोलाही पवार यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या