Ticker

6/Breaking/ticker-posts

देवभक्त असाल तर मंदिराची कुलुपे तोडून टाका; संभाजी भिडे यांचं वक्तव्य

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 सांगली: करोना म्हणजे शासनाने उठवलेले थोतांड आहे. करोनामुळे सध्या मंदिरे बंद असून देवांना कुलूपबंद करून ठेवण्यात आलं आहे. माझं केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल तर मंदिरांची कुलूपं तोडून आत जाऊयात, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांनी अलिकडेच करोना संदर्भात केलेली वक्तव्ये चांगलीच वादग्रस्त ठरली आहेत. आपल्या या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेत आणखी भर घातली आहे. पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, करोना म्हणजे थोतांड आहे. हे शासन हा थोतांडपणा वाढवत आहे. लॉकडाऊन लावल्यामुळेच अधिक नुकसान होत आहे. सगळं मोकळं करू देत. काहीही देशात वाटोळं होणार नाही. करोनाच्या लॉकडाऊनमुळे जेवढं नुकसान झालंय, त्याच्या एक अब्जांश देखील वाटोळं होणार नाही. सरकार लॉकडाऊन लावतंय ते शंभर टक्के चूकच आहे.

करोनामुळे मंदिर बंद ठेवल्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, देव सध्या कुलूपबंद आहेत. गावोगावच्या मंदिरांची कुलूपं तोडून टाकू. माझं केवळं महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सबंध देवभक्तांना आवाहन आहे की, खरंच देवभक्त असाल तर हे कुलूप तोडून आत जाऊयात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या