Ticker

6/Breaking/ticker-posts

विविध मागण्यांसाठी महिला परिचरांच्या आंदोलनाने जि.प आवार दणाणले

 *जिल्हाभरातील महिला परिचरांचा आंदोलनात सहभाग    







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अ.नगर : जिल्ह्यातील व राज्यातील प्रा.आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात सेवेत असलेल्या अंशकालीन महिला परिचरांना किमान वेतन मिळावे, सेवेत कायम करावे, कोविड भत्ता मिळावा, दरवर्षी गणवेष व ओळखपत्र मिळावे आणि अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा या मागण्यांसाठी जिल्हापरिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने जिल्हापरिषदेच्या आवारात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.यावेळी परिचरांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषद आवार दणाणून गेले.


या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या अध्यक्षा कल्पना धनवटे,सरचिटणीस मंगल उगले,कोषाध्यक्षा मंगल वारे, यांनी केले. यावेळी जानेवारी २०१६ च्या महागाई निर्देशांका नुसार किमान मासिक वेतन रु.१८,००० शासन देऊ लागते मात्र असंघटित असल्याने त्रिपक्ष कामगार परिषदेच्या किमान आजच्या महागाईच्या काळात किमान वेतनाची मागणी पूर्णपणे व्यवहार्य आहे.त्याच बरोबर महिला परिचरांनां नियमित सेवेत कायम करावे, दरवर्षी गणवेश व ओळखपत्र देण्यात यावीत, कोविड भत्ता देण्यात यावा अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, पेंशन योजना लागू करावी, दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन मिळावं ,आदी दहा मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले.


महिला परिचर हा आरोग्य विभागाचा कणा आहे. परंतु शासन धोरणात जाणीवपूर्वक विसंगती ठेवण्यात येत आहे. तरी शासनाने यात  दुजाभाव न करता सामान वागणूक द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.  
संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हापरिषद,आरोग्य अधिकारी आदींना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून महिला परिचर मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या