Ticker

6/Breaking/ticker-posts

२ लाखासाठी २५ लाखाची जमीन लिहून घेणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

कर्जत:  तालुक्यातील    मिरजगाव येथील खाजगी सावकाराने व्याजाने दिलेल्या रकमेत कर्जदारची २० गुंठे जमीन परस्पर नावावर करून घेतल्याने एयाक्च गोंधळ उडाला. कर्जदार व जमीन मालकाने थेट पोलिस ठाणे गाठल्याने सादर प्रकार उघडकीस आला असून सावकारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुखदेव दिनकर केदारी, (रा.मिरजगाव ता.कर्जत) याने कुंडलिक छगन सुपेकर (रा.मिरजगाव) यांना २ लाख रुपये व्याजाने देऊन त्यांच्याकडून  तारण म्हणुन २० गुंठे जमीन मध्यस्थीकडुन आपल्या नावे लिहून घेतली होती. सन २०१५ रोजी फिर्यादीने बांबूचा स्टेशनरीचा धंदा टाकण्यासाठी पैशाची अडचण असल्याने आपल्या परिचयातील संदीप यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र संदीप यांनी 'माझ्या परिचयाचा खाजगी सावकार असून त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो असे सांगितले.

फिर्यादी व फिर्यादीचे परिचयाचे संदीप यांनी खाजगी सावकार सुखदेव केदारी यांच्याकडून २ लाख रुपये ४ रु. टक्के व्याजदराने घेण्याचे ठरले. त्याबदल्यात फिर्यादीच्या मालकीची मधुकमल मंगल कार्यालयाच्या समोरील २० गुंठे जमीन मध्यस्ती संदीप याच्या नावे करून देण्याचे ठरले होते. परंतु इच्छा नसताना सावकाराच्या बळजबरीने सावकारकीच्या पैशांमुळे (दि.७ डिसेंबर २०१५ रोजी) जमिनीचे खरेदी खत संदीप यांच्या नावे करून दिले. दुसऱ्या दिवशी केदारी यांनी फिर्यादीला २ लाख रुपये  ४ टक्के व्याजदराने आणुन दिले.त्या पैशांचे ४ महिन्याचे ८ हजार प्रमाणे केदारी यांचेकडे दिले. मात्र त्यानंतर फिर्यादीला वेळेवर व्याज देणे जमले नाही. त्यामुळे सावकाराने संदीप याच्या नावे असलेले क्षेत्र आपली पत्नी छाया केदारी हिच्या नावावर करून देण्याचे सांगितले. दि.२३ जानेवारी २०१७ रोजी सदर क्षेत्र हे सावकाराच्या पत्नीच्या नावे करून देण्यात आले.

 

मात्र खरेदी झाल्यानंतर फिर्यादीला ही बाब समजली. व्याज व मुद्दल दिल्यानंतर सदरील जमीन ही पुन्हा आपल्या नावे पलटून देण्याचे ठरले होते. त्यानंतर 

एप्रिल २०२१ मध्ये फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी सावकाराकडे जाऊन सर्व रक्कम परत देऊन जमीन पलटून देण्याची विनंती केली. मात्र सावकार व त्याची पत्नी व इतर यांनी 'जमीन पुन्हा मला मागायची नाही ही जमीन आम्ही दत्तात्रय कोरडे याच्याकडून घेतली आहे, त्यात तुमचा काहीही संबंध नाही जर जमीन हवी असेल तर मला २५ लाख द्यावे लागतील व २० गुंठ्यातील २ गुंठे क्षेत्र माझ्या नावे करून द्यावे लागेल, अशी अट घातली.

 

 फिर्यादीने प्रतिष्ठित मंडळी, राजकीय मंडळी अनेकांना मध्यस्ती करायला लावले मात्र सावकार आपल्या अटीवर ठाम होता. फिर्यादीची हालचाल पाहून फिर्यादी हा सदरची जमीन फिर्यादीचे ताब्यात असून कसत असताना सुद्धा सावकाराने (दि.७ जून २०२१ रोजी) कर्जतच्या बँकेकडून ९ लाखांचा बोजा त्या जमिनीवर चढवला. याबाबत विचारपुस केली असता 'मी आता चालू बाजारभावाने हे क्षेत्र विकणार असून तुला काय करायचे ते कर'असे सुनावले. त्यानंतर सावकार हा कोकणगाव येथील एका इसमाला सदरील क्षेत्र 28 लाख रु ला विकत असल्याचे समजल्यावर फिर्यादीने सावकार सुखदेव केदारी, छायाबाई केदारी व इतर यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

 

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलीसक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक   अमरजीत मोरे, पोलीस नाईक बबन दहिफळे, प्रबोध हांचे, जितेंद्र सरोदे हे पुढील तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे तालुक्यातील गोरगरिबांचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या