Ticker

6/Breaking/ticker-posts

नेहरू मार्केट व प्रोफेसर कॉलनी चौकात भव्य व्यापारी संकुले उभारणार - उपमहापौर गणेश भोसले

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर : नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक व चितळे रोडवरील नेहरू भाजी मार्केट येथील मनपाच्या जागेवर अनेक वर्षापासून प्रलंबित  असलेले व्यापारी संकुलांची भव्य स्वरुपात उभारणी करणार असल्याची माहीत उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.

 

या दोन्ही ठिकांनी प्रस्तावीत  व्यापारी संकुलन उभारण्यासंदर्भात अनेक वर्षापासून सुरु असलेला प्रस्ताव प्रलंबित आहे.तरी रखडलेले काम सुरु करण्यासाठीच्या कागदपत्राची माहिती गेल्या आठ जुलै रोजी तीन दिवसांत सादर करण्याचे सूचना देऊनही आज पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही, तरी पुन्हा एकदा स्मरणपत्र देत असून सदर माहिती देण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त यांच्याकडे उपमहापौर गणेश भोसले यांनी केली आहे.

 

उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,चितळे रोड व प्रोफेसर चौकातील मनपाच्या जागेवर व्यापारी संकुल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून या जागेवर भव्य-दिव्य इमारत उभारून शहराच्या वैभवात भर टाकण्यात येईल,महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी विविध उपाय योजना करणे गरजेचे आहे.पुढील काही महिन्यात या विषयाला चालना झालेली दिसेल यासाठी यासर्व कागदपत्रांचा अभ्यास करून या कामाला चालना दिली जाईल असे ते म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या