Ticker

6/Breaking/ticker-posts

युवक काँग्रेसचे अभिनव आंदोलन; नगर शहरातील खड्याचे ‘मनपा आयुक्त साहेब खड्डा’ नामकरण

  
 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर :अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने नगर शहरामध्ये स्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून प्रत्येक नागरिकांना शहरांमध्ये फिरण्यासाठी खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. 

त्यामुळे अनेकांचे छोटेमोठे अपघात होत आहे  नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी देखील कठीण होत असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबेआमदार डॉसुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली  युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या संकल्पनेतून जुनी मनपा कार्यालय येथील बेग पटांगण समोरील रस्त्यावरील खड्डयांना मनपा आयुक्त साहेब खड्डा असे नामकरण करण्यात आले.

 यावेळी  सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष योगेश दिवानेयुवक काँग्रेसचे योगेश काळेविशाल कळमकरआशिष गुंदेजाप्रमोद अबुजअक्षय शिंदेईश्वर जगतापअजय मिसळमहिला काँग्रेसच्या नलिनी गायकवाडसुनीता बागडे आदी उपस्थित होते.           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या