लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पहिल्या सामन्यासाठी भारताकडून युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. भारतीय संघात यावेळी पाच फलंदाज, दोन अष्टपैलू खेळाडू, आणि चार गोलंदाजांचा समावेश केला जाऊ शकते. भारताच्या डावाची सुरुवात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघे करतील, असे जवळपास निश्चित समजले जात आहे. कारण आतापर्यंत देवदत्त पडीक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. त्यामुळे शिखर आणि धवन हे दोघे सलामीला येऊ शकतात. त्याचबरोबर मधल्याफळीमध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण सध्याच्या घडीला तो चांगल्या फॉर्मात आहे. सूर्यकुमारबरोबर मनीष पांडे हा मधल्याफळीत पाहायला मिळू शकतो. मनीषसाठी ही कदाचित अखेरची संधी असू शकते. इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यामध्ये यष्टीरक्षकाच्या जागेसाठी चढाओढ पाहायला मिळू शकते. पण संजू सॅमसनला झुकते माप मिळू शकते, असे म्हटले जात आहे. भारतीय संघात दोन अष्टपैलू खेळाडू हे हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधू असतील, अशी दाट शक्यता आहे. कारण या दोघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे या दोघांना पहिल्या सामन्यात एकत्रितपणे संधी देण्यात येऊ शकते. भारतीय संघ या सामन्यात दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह उतरण्याच्या तयारीत आहे.
भारतीय संघ यावेळी उपकर्णधार भुवनेश्वर
कुमार आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांना संधी देण्याच्या तयारीत आहे.
फिरकीपटूंचा विचार केला तर भारतीय संध पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाजांना संधी देऊ
शकतो. त्यामुळे पहिल्या सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन्ही
फिरकीपटूंना संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात भारताच्या अनुभवी खेळाडूंना संधी
देण्यात येईल आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर युवा खेळाडूंना
पदार्पण करण्याची संधी मिळेल, असे सध्याच्या घडीला म्हटले जात आहे.
0 टिप्पण्या