Ticker

6/Breaking/ticker-posts

पंकजाताई दिल्लीत ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची शक्यता.



















लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


बीड  काही दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यात महाराष्ट्रातील चौघा जणांचा समावेश करण्यात आला.नारायण राणे,भारती पवार,कपिल पाटील आणि भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आले.बीडच्या खासदार प्रितमताई मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा बीड जनतेची व तमाम भाजप कार्यकर्त्याची होती.पण संधी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी झाल्यामुळे बीड जिल्ह्यात तसेच राज्यभरात पंकजाताई समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली.दिल्लीत आज भाजप च्या राष्ट्रीय सचिवांची बैठक असल्याकारणाने त्या दिल्लीत दखल झाल्या .

  दिल्लीत त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट देखील होणार असल्याची शक्यता आहे. 

राजीनामे देणार्यात जिल्हा कार्यकारिणीचे सरचिटणीस सर्जेराव तांदळेंनी पहिल्यांदा राजीनामा दिला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष निवडून आलेले मात्र पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीय जिल्हा परिषद सदस्य सविता रामदास बडे, भाजपच्या जि. प. सदस्य भागीरथी रामराव खेडकर यांच्यासह शिरूरचे पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, भटक्या विमुक्त आघाडीचे लक्ष्मण जाधव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, आष्टी तालुकाध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य युवराज वायभासे, जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, सोशल मीडिया प्रमुख अमोल वडतिले, महारुद्र खेडकर, युवा माेर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे, संतोष ढाकणे, श्याम महारनोर यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत.

बीड जिल्ह्यातील ११ तालुका अध्यक्ष आणि विविध अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यात आल्याचे समजते. तसेच राज्यभरातील  काही आमदार व पदाधिकारी देखील राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या