महापौर,उपमहापौरांनी घेतली घनकचरा विभागाची बैठक
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर: महापालिकेचे अधिकारी,कर्मचारी व ठेकेदार यांना आपल्या कामाचा मोबदला दिला जात आहे. त्यांना दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी आम्ही कोणालाही बळजबरीने नहाक त्रास देण्याचे काम करत नाही,यापुढील काळात प्रत्येकाने चांगले काम करून स्वच्छ,सूंदर शहर ठेवण्याचे काम करावे अन्यथा कागदावर घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल वेळ पडल्यास निलंबित केले जाईल, असा इशारा उपमहापौर गणेश भोसले यांनी दिला.
अहमदनगर महानगरपालिकेत घनकचरा विभागाची आढावा
बैठक पार पडली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे,उपमहापौर गणेश भोसले,उपयुक्त यशवंत डांगे,आरोग्य अधिकारी डॉ.सतिष राजूरकर,
घनकचरा विभागाचे अधिकारी डॉ.शंकर शेडाळे, नगरसेवक
प्रकाश भागानगरे, नगरसेवक सचिन शिंदे, निखिल
वारे,सचिन जाधव,बाळासाहेब पवार,अजिंक्य बोरकर, आदीसह अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमहापौर गणेश भोसले म्हणाले
की,
सध्या नगर शहरामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी
थोड्याप्रमाणात वाढत चालली आहे,तरी महापालिका आरोग्य
विभागाने या कोरोना रुग्णांनच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करून घ्यावी
जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही,शहरातील कोरोनाची
रुग्ण संख्या शून्य कशी होईल, या मध्ये लक्ष केंद्रित करावे,
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित
राहण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात.
नगर शहरामध्ये आता ठिक-ठिकाणी कचरा न
उचलल्यामुळे कचऱ्याचे ढीग दिसत आहे. पूर्वी कचरा उचलल्यानंतर प्रत्येक
प्रभागाप्रमाणे निर्जंतुकीकरण पावडर मारली जात होती आत ती मारली जात नाही त्यामुळे
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.तसेच चिकन,मटनचे
वेस्टेज रस्त्याच्या तसेच ओढ्या नाल्याच्या बाजूला फेकले जाते,त्यामुळे कुत्र्यांचा मोठा उपद्रव वाढला आहे याबाबत उपाययोजना कराव्यात,पावसाळा सुरू झाला आहे शहरातील काही भागात नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे
पाणी घुसते त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक
प्रश्नांबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.याचबरोबर साथीचे रोगही सुरू होत आहे
यासाठी उपाययोजना कराव्यात आपण केलेले काम नागरिकांना दिसले पाहिजे,अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदार मार्फत सुरू असलेल्या घनकचरा
विभागातील कामाकडे लक्ष द्यावे, घनकचरा विभागातील प्रत्येक
कर्मचाऱ्याने गणवेष व ओळखपत्रा मध्ये कामावर यावे अशा सूचना घनकचरा विभागातील
अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपमहापौर भोसले यांनी दिल्या. यावेळी महापौर रोहिणीताई
शेंडगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या विविध सूचना केल्या.
0 टिप्पण्या