Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीलंकेचा सुपडा साफ करणार टीम इंडिया! आज तिसरा अन् शेवटचा वनडे रंगणार

 *श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत आजचा तिसरा सामना

*अंतिम सामना जिंकून श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याच्या इराद्द्याने टीम इंडिया मैदानात
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

India vs Sri lanka : श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे. आता आजचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकून श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची देखील शक्यता आहे.  

 शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सामना सात गडी राखून जिंकला. या सामन्यात शिखर धवनसह पृथ्वी शॉ, ईशान किशननं शानदार खेळी केली. दुसऱ्या सामन्यात  दीपक चहरच्या नाबाद 69 धावांच्या खेळीमुळे पराभवाच्या दिशेनं चाललेल्या टीम इंडियाला विजय मिळाला.  त्यामुळं आजच्या सामन्यात पृथ्वी शॉलाच सलामीला पाठवावे की त्याच्या जागी देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी देतील याकडे लक्ष लागले आहे. सोबतच विकेटकिपर फलंदाज इशान किशनच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते.  संघातील युवा गोलंदाज नवदीप सैनी किंवा चेतन सकारिया यांना देखील संधी मिळू शकते. 

किती वाजता सामना

भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 तीन वाजता सुरु होईल. 

कुठे पाहू शकाल सामना
भारत आणि श्रीलंकेदरम्यान खेळला जाणारा हा सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहू शकणार आहात. हे सामने या नेटवर्कवर आपण हिंदी आणि इंग्लिश कॉमेंट्रीसोबत पाहायला मिळेल.  या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह अॅप आणि त्यांच्या वेबसाईटवर पाहू शकाल. सोबतच आपण लाईव्ह स्कोर आणि अपडेट https://www.abplive.com  वर देखील पाहू शकाल.

असे आहेत संघ
भारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.

श्रीलंका : दसून शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्व्हा, अविष्का फर्नाडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरिथ असलंका, वाहिंदू हसरंगा, अशेन बंदारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नाडो, धनंजया लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नाडो, कसून रजिथा, लाहिरू कुमारा, इसुरू उडाना.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या