Ticker

6/Breaking/ticker-posts

खडका फाटा येथे गॅसच्या पाईपलाईनला धडकून १ ठार

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 देवगड :नगर -औरंगाबाद महामार्गावर खडका फाट्यानजीक पतंजली कंपनी समोर महामार्गालगत  सुरु असलेल्या गॅस पाईप लाईनच्या पाइपवर कार धडकून अपघातात एक जण ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली .

 याबाबत माहिती अशी की,चिखली येथून दुपारी ४ वाजेच्या सुमारास पनवेल येथे जाण्यासाठी सिडको मुंबई (बेलापूर) चे अभियंते राजकुमार नारायण बडवे (वय ५४)  व त्यांच्या सोबत अरुण सोपानराव जाधव ,कमलाकर शेषराव कांबळे  हे निघाले होते. खडका फाट्यानजीक पतंजली कंपनीच्या नजीक आले असता गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या गॅस पाईपलाईनच्या पाईप वर त्यांची गाडी धडकली।

 अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पो.नि.विजय करे,पो.कॉ.अशोक कुदळे ,केवल राजपूत ,जयवंत तोडमल हे घटनास्थळी हजर झाले जखमींना उपचारासाठी नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता  इंजि.बडवे यांना मयत घोषित करण्यात आले अन्य दोघांवर उपचार सुरु आहेत मयत बडवे यांचा मृतदेह शवविच्छेदन  नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. याबाबत नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली  पुढील तपास पो.ना.जयवंत तोडमल करत आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या