Ticker

6/Breaking/ticker-posts

पुणे -शिरुर दुमजली फ्लायओव्हरसाठी निधी मंजूर ; कोल्हेंनी मानले गडकरींचे आभार



 







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेत आभार मानले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे हे सध्या दिल्लीत आहेत. यावेळेस अमोल कोल्हे यांची गडकरींसोबत भेट झाली. कोल्हे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत नितीन गडकरींचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने पुणे शिरुर रस्त्यावर दुमजली फ्लायओव्हर व तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता चौपदरीकरण यासाठी एकूण ८ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे, याबद्दल शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आभार मानले, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

याआधी अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आपल्या शिरुर मतदारसंघातील नगर रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघत आहे, असं म्हटलं होतं. पुणे-शिरुर दरम्यान दुमजली पुलाचा एलिव्हेटेड कॉरीडॉर (६७ कि.मी) व चाकण-शिक्रापूर चौपदरीकरणासाठीचे काम लवकरच पुर्ण होत असून यासाठीचा निधी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंजूर केला, असं कोल्हे यांनी म्हटलं होतं.

केंद्र सरकारने या दोन्ही कामांसाठी सुमारे ८२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातील सुमारे ७ हजार २०० कोटी रुपये पुणे शिरुर दरम्यानच्या दुमजली एलिव्हेटेड कॉरीडॉरसाठी तर १ हजार १५ कोटी रुपये तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही अमोल कोल्हे यांनी दिली आहे. तसंच, पुणे शिरूर रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनविण्यासाठी रु. २० कोटी मंजूर केले असून अगदी उद्यापासून म्हणजे बुधवारी (दि.२८ जुलै) सल्लागार (कन्सल्टंट) नेमणुकीची निविदा प्रक्रिया सुरु होत आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरु होऊन ते वेगाने पुर्ण होईल हा विश्वास आहे, असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या