Ticker

6/Breaking/ticker-posts

वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, शेवगावमध्ये तरुणाविरूद्ध गुन्हा दाखल

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अह्मदनगर :  शेवगाव तालुक्यात महत्वाच्या पदावर असलेल्या एका वरिष्ठ महिला अधिकार्याचा विनयभंग   केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा तरुण अधिकाऱ्याला अश्लील शेरेबाजी करणे, अश्लील मेसेज पाठविणे, बदनामी करणे, एकटी असताना कार्यालयीन कक्षात जाण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्रास देत होता. त्याला विरोध केल्याने खोट्या तक्रारी आणि आंदोलने करू लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शेवगावमधील या महिला अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली होती. त्याची चौकशी करून पोलिसांनी विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली, शेवगाव) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. महिला अधिकाऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात सुरूवातीला त्या तरुणाच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी यावर चौकशी केली. तथ्य आढळून आल्याने मंगळवारी बलदवा याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, बलदवा त्यांना फोन करुन, कार्यालयात चकरा मारुन ओळख वाढवण्याचा प्रयत्न करायचा. मी आपल्याला अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी मदत करतो, त्यातून येणारे पैसे मी तुम्हाला पोहच करत जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याजवळ तुमचे मन हलके करत जा, असे म्हणून तो महिला अधिकाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तसेच त्यांच्यावर पाळत ठेवत होता. तुम्ही छान ड्रेस घालता. त्यामुळे तुम्ही छान व फ्रेश दिसतात अशी शेरेबाजेही करीत होता. त्यावर अधिकाऱ्यांनी त्याला तंबी देऊन केवळ कार्यालयीन कामासंबंधीच बोलावे, असे सांगितले. तरीही त्याने पाठलाग करणे सुरूच ठेवले.

त्यानंतर तो त्यांच्या कामात ढवळाढवळ करू लागला. त्यांच्या विरोधात अर्ज करून आणि फोन करून त्रास देऊ लागला. उपोषणाचा इशारा देऊन त्यासाठी फलक छापून घेतले. त्यावर विचित्र फोटो छापून अधिकाऱ्यांची बदनामी केली. त्यांचे पती व मुली बद्दल वाईट बोलत असे. त्यांनीही मेसेज करून चुकीची आणि बदनामीकारक माहिती देत असे. अशा प्रकारे मानसिक त्रासही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातही एका महिला अधिकाऱ्याला त्रास देणाऱ्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या