गिरीश साठे यांच्या आर्थिक योगदानातून ६० गरजूंना किराणा साहित्य वाटप
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव :- सुप्रसिद्ध अष्टांग योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या श्रीदत्त देवस्थानात गुरुपौर्णिमा दत्तभक्त व साधकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने दत्तभक्त योगेश तायडे यांनी दत्तगुरूंची आकर्षक पाना-फुलांनी मनमोहक पूजा बांधली. पितळी प्रभावळीने सद्गुरु श्रीदत्तात्रेयाची प्रसन्ना मुद्रा आणखीनच खुलून गेली दत्त देवस्थानचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, फुलचंद रोकडे तसेच रवींद्र पुसाळकर व सौ. वृषाली पुसाळकर या ज्येष्ठ साधक दाम्पंत्याच्या हस्ते गुरुमाऊली पू. दादाजींच्या चांदीच्या पादुकांवर अत्यंत भारावलेल्या वातावरणात पंचसूक्त पवमान अभिषेक घालण्यात आला. तुकाराम चिक्षे गुरुजी यांनी पौरोहित्य केले, त्यानंतर महाआरती झाली. सर्वांना प्रसाद पेढ्याचे वाटप करण्यात आले.
श्रद्धावान साधक सौ.आरती पवार- चाळके, बाळासाहेब मुरदारे, बाळासाहेब चौधरी, बाबुशेठ जोशी,पी.बी. शिंदे, संजय कुलकर्णी, जगन्नाथ गोसावी, लक्ष्मण काळे, मुकुंद भट्टड, सुभाष गोलांडे, निलेश रोकडे, बन्सीधर पांगरे, प्रकाश बाहेती, सुरेश घुले, सुभाष गोलांडे, सारंगधर म्हस्के, धर्मराज बटुळे, रामनाथ शेकडे, गणेश घोडके, आयुब शेख आदी याप्रसंगी उपस्थित होते. मुंबईचे उद्योजक तथा ज्येष्ठ साधक गिरीश साठे यांच्या संकल्पनेतून तसेच आर्थिक योगदानातून शेवगाव शहर व परिसरातील ६० गरीब व गरजू कुटुंबांना या hbवेळी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. दादाजी प्रसादालयात साधक श्री.व सौ.पुसाळकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.
0 टिप्पण्या