Ticker

6/Breaking/ticker-posts

NATA 2021च्या दुसऱ्या टेस्टचा निकाल जाहीर, असा पाहा

 

*NATA 2021 च्या दुसऱ्या टेस्टचा निकाल जाहीर

*११ जुलैला देशभरातील परीक्षा केंद्रांवर झाली परीक्षा

*अधिकृत वेबसाइटवर मिळेल माहिती
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

2nd Test Result: काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे NATA 2021 च्या दुसऱ्या टेस्टचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट nata.in वर हा निकाल पाहू शकता. NATA 2021  ची दुसरी परीक्षा ११ जुलैला भारताच्या २४८ केंद्रांवर आणि आंतरराष्ट्रीय शहरांमधील ६ केंद्रांवर घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण २१ हजार ६५७ उमेदवार उपस्थित होते. दुसऱ्या टेस्टमध्ये ११ हजार ५८३ उमेदवार पात्र ठरले.

त्याव्यतिरिक्त,कॉम्पेटंट प्राधिकारणातर्फे(Competent Authority) ३ सप्टेंबर २०२१ ला NATA 2021 ची तिसरी टेस्ट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

NATA 2021 Examination result: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल

स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट nataregmission.in वर जा.

स्टेप २- 'NATA 2021 Result' या लिंकवर क्लिक करा

स्टेप ३- मागितलेली माहिती भरा

स्टेप ४- रिझल्ट तुमच्या समोर येईल. (थेट निकाल पाहण्यासाठी बातमीखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा)

स्टेप ५- रिझल्ट डाऊनलोड करा

स्टेप ६- भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा.

रिझल्टच्या लिंकवर थेट जाण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा

NATA 2021 ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या अर्जदारांनी NATA च्या दोन परीक्षांपैकी एक दिली असेल ते तिसरी NATA चाचणीसाठी नोंदणी करु शकतात. दोन्ही NATA परीक्षा देणारे उमेदवार तिसऱ्या NATA परीक्षेसाठी पात्र नसतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या