Ticker

6/Breaking/ticker-posts

हुंड्यात 10 लाख, लॅब्राडोर कुत्रा, 21 नखी कासवाची मागणी ! नवर्या मुलाला मुलीने केला ‘बाय-बाय..’

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 औरंगाबाद : औरंगाबादेत नाशिकमधील नवरा मुलाकडील मंडळींनी वधू पित्याकडे हुंड्यात चक्क 10 लाख रुपये आणि  सोबतच लॅब्राडोर जातीचा काळ्या रंगाचा कुत्रा आणि 21 नखी कासव मागितल्याचं समोर आले. मात्र हुंड्याची मागणी केल्याने मुलीने त्या मुलासोबत लग्न करण्यास नकार तर दिला. याशिवाय असला हुंडा मागणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवला आहे. कायद्यानुसार हुंडा मागणे गुन्हा असला तरी आजही समाजात लग्न जमवताना हुंड्याची सर्रास मागणी केली जाते. पूर्वी पैसे मागितले जायचे नंतर, लोक सोन्याचे दागिने मागू लागले आता तर चक्क कासव आणि कुत्रा मगितल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.


मूळचा नाशिकचा असलेला आणि सैन्य दलात नोकरी करणारा एक मुलगा औरंगाबादेत मुलगी पाहायला आला. घरच्यांची बोलणी झाल्यानंतर मुलाला मुलगी पसंत झाली. साखरपुडाही झाला आणि त्यानंतर मुलाकडील व्यक्तींनी मुलीला नोकरी लावतो म्हणून दहा लाखाचा हुंडा, 21 नखी जिवंत कासव, लॅब्राडॉर जातीचा काळा कुत्रा आणि समईची मागणी केली.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लॅब्राडोर जातीचा काळा कुत्रा, 21 नक्की कासव आणि समई कशासाठी? तेही हुंड्यात. तर याचे उत्तर मुलीच्या वडिलांनी असं दिलं. काळा लॅब्राडॉर कुत्रा असेल तर घरात शांतता राहते. 21  नक्की कासव असल्यानंतर घरात सुख समृद्धी आणि संपत्ती येते. पूर्वी रेडिओ आणि घड्याळ हुंड्यात मागितला जायचा. आता अत्याधुनिक काळात हुंडा कुठपर्यंत पोहोचलाय.


मुलीच्या वडिलांनी सुरुवातीला हुंड्यात काही पैसे दिले होते. पण मुलाच्या घरच्यांकडून सातत्याने पैशांची मागणी वाढल्याने मुलीनेच वडिलांना अशा मुलाशी लग्न करणार नसल्याचं सांगितलं. मुलीच्या वडिलांना मुलगा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात उस्मानपूरा पोलीसात तक्रार केली आहे. पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून नाशिकच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीएसआय साधना आढाव या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

 

गडगंज श्रीमंत असलेल्या व्यक्तींनी देखील हुंड्याची मागणी केल्याचं  यापूर्वी आपण ऐकलं असेल. पण हुंड्यात कुत्रा आणि कासव मागणारी ही पहिलीच घटना असेल. ज्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि शांततेसाठी कुत्रा आणि कासवांची गरज पडते अशा व्यक्तीशी लग्न न करणाऱ्या या मुलीचा हा निर्णय निश्चितच अभिमान वाटावा असाच आहे. एवढच. बाकी  डुंड्यात कासव आणि कुत्रा मागणा-यांचा  समाचार पोलीस घेतीलच..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या