Ticker

6/Breaking/ticker-posts

नवलच ! आता स्मार्टफोनच्या स्क्रिनवरून होणार करोना चाचणी









लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 लंडन: स्मार्टफोनच्या स्क्रीनवरूनच कोव्हिड चाचणी करण्याची पद्धत लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमधील संशोधकांनी विकसित केली आहे. काही सेकंदात एसएमएसद्वारे याचा अहवाल मिळणार आहे. हे संशोधन अद्याप प्रायोगिक पातळीवर आहे.


फोन स्क्रीनिंग टेस्ट (पोस्ट) असे नाव या चाचणीला देण्यात आले आहे. नेहमीच्या पद्धतीने नाकातून स्वॅब घेऊन केल्या जाणाऱ्या पीसीआर चाचणीऐवजी नव्या पद्धतीने घेतलेल्या चाचण्यांची तपासणी संशोधकांनी केली. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेले लोक आरटी-पीसीआरमध्येही पॉझिटिव्हि आढळले. ई-लाइफया वैत्रानिक नियतकालिकात गेल्या मंगळवारी याबाबतचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

कोणी केले 
संशोधन ?


ब्रिटनमधील 'युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन'मधील 'इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी'तील रॉड्रिगो यंग यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी हे संशोधन केले.

कसे ?

संशयित रुग्णांच्या नाकातून स्वॅब घेण्याऐवजी त्यांच्या मोबाइल स्क्रीनवरून नमुने घेण्यात आले. या पद्धतीचा मोठा फायदा म्हणजे स्वत:च स्वत:ची चाचणी करता येते. त्यामुळे 
कोरोना चाचणी करताना अन्य व्यक्तीचा संपर्क टाळला जातो.

संशोधनाचे निष्कर्ष

मोबाइलवरून घेतलेल्या चाचण्यांतील पॉझिटिव्ह रुग्ण अन्य पारंपरिक चाचण्यांतही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. चाचण्यांची यशस्विता ८१ टक्क्यांहून अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले. अँटीजेन चाचण्यांइतकीच ही चाचणीही विश्वासार्ह असल्याचा दावा संशोधकांनी केला.

संशोधनाचे महत्त्व

पीसीआर चाचण्या महाग असून, ही चाचणी स्वस्त असणार आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड कमी होईल. विशेष म्हणजेय गरीब देशांमध्येही करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

सद्यस्थिती 

रॉड्रिगो यंग यांच्या चिलीतील स्टार्ट अपकडून यासाठी एका यंत्राचा विकास सुरू आहे. यंग यांच्या संशोधनाचा त्यासाठी आधार आहे. चाचणीसाठी मोबाइलवरून नमुने घेऊन एसएमएसद्वारे अहवाल देण्यात येणार.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या