Ticker

6/Breaking/ticker-posts

'ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं’, दुबार पेरणीची गरज पडल्यास 'ही' कंपनी मोफत करणार मदत.. !

 'ना नफा ना तोटा' या तत्त्वानुसार मिळणार मदतलोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नांदेड : मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या. परंतु गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं नफा ना तोटा या तत्त्वानुसार मोफत पेरणी करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 

शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले कृषिभूषण भगवान इंगोले यांनी याबद्दल घोषणा केली आहे. नेनेहमीोण त्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागणाऱ्या बळीराजाला यावर्षी वेळेवर पेरणी झाल्याचे समाधान वाटण्या अगोदरच पावसाने आठवडाभराची उघडीप दिल्याने अन्य काही कारणांमुळे पेरलेले बियाणे उगवले की नाही याची शाश्वती नाही. अनेक भागात दुबार पेरणी करण्याचे संकट दिसत आहे. करोनाच्या भीषण संकटात पहिलीच पेरणी मोठ्या मुश्किलीनं केली. त्यात दुबार पेरणीचे संकट आल्यास शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जाण्याशिवाय पर्याय नाही.


यामुळे अशा अडचणीच्या काळात कर्तव्यभावनेने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी मालेगावच्या वतीने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी नफा ना तोटा तत्त्वावर डिझल तुमचं ट्रॅक्टर आमचं या तत्त्वावर मोफत पेरणी करून देण्यात येणार आहे. शेतकरी मित्र फार्मर प्रोडय़ुसर कंपनीने करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेतल्याने सर्व स्तरातून त्यांचं स्वागत होत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या